सिन्नर : वडांगळी येथील शहीद संदीप ठोक अभ्यासिकेच्या फर्निचर कामास लवकरच सुरुवात होणार आहे. यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या स्थानिक विकास निधीतून सात लाख पन्नास हजार रुपये मंजूर झाले आहेत. वडांगळीत शहीद संदीप ठोक अभ्यासिका साकारलेली आहे. या अभ्यासिकेस फर्निचरची गरज असल्याने त्यास मंजुरी देण्याची मागणी सुदेश खुळे यांनी कोकाटे यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून सहा महिन्यांपूर्वी वडांगळी ग्रामपंचायतीचे तत्कालीन प्रशासक रवी पवार व ग्रामविकास अधिकारी पी. एस. सोळंके यांना अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. अभ्यासिकेस फर्निचर मंजूर झाल्याने सरपंच योगेश घोटेकर, उपसरपंच गायत्री खुळे, माजी सरपंच शिवाजी खुळे, खंडेराव खुळे, दत्तात्रय खुळे, विकास संस्थेचे अध्यक्ष शरद खुळे, उत्तम खुळे, गणेश कडवे, राजेंद्र भुसे, शेखर खुळे, नानासाहेब खुळे, अमित भावसार, कृष्णा खुळे, शंकर गडाख, गौतम खरात, रमेश क्षत्रिय, निखिल कुलथे, यासीर शेख, रवी माळी आदींसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
शहीद ठोक अभ्यासिका फर्निचरसाठी साडेसात लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:11 AM