शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जिल्ह्यातील सात धरणे हाउसफुल्ल

By admin | Published: August 04, 2016 1:14 AM

विसर्ग सुरूच : सरासरी ५३ टक्के साठा

नाशिक : पावसाच्या दमदार हजेरीमुळे जिल्ह्णातील लहान-मोठ्या २३ धरणांमध्ये जवळपास ५३ टक्के पाणीसाठा झाला असून, त्यातील सात धरणांनी शंभरी गाठल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. जिल्ह्णातील धरणांची साठवण क्षमता ६५ हजार ८७४ दशलक्ष घनफूट इतकी असून, आजवर शंभर टक्के धरणे भरल्याची नोंद शासन दरबारी नसली तरी, यंदा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातच ३४ हजार ७७४ दशलक्ष घनफूट इतके पाणी धरणांमध्ये साठल्यामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या वर्षी हेच प्रमाण फक्त ३४ टक्के इतके म्हणजेच २२ हजार ४२६ दशलक्ष घनफूट पाणी २ आॅगस्टपर्यंत साठले होते. यंदा आॅगस्टमध्ये भावली, वालदेवी, नांदूरमधमेश्वर, आळंदी, भोजापूर, हरणबारी, केळझर हे मध्यम प्रकल्प म्हणजेच धरणे शंभर टक्के भरली असून, त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याशिवाय करंजवण व वाघाड या धरणांनी नव्वदी पार केली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या दोन दिवसांत तेही हाऊसफुल्ल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.जिल्ह्णातील धरण समूहाचा विचार करता, गंगापूर धरण समूहात ७९ टक्के पाणीसाठा असून, पालखेड धरण समूहात ९२ टक्के, ओझरखेड समूहात ५६ टक्के, दारणा समूहात ७२ टक्के व गिरणा समूहात ५३ टक्के इतकाच साठा आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शंभर टक्के भरलेल्या धरणांमधून पाणी सोडले जात आहे. बुधवारी गंगापूर, पालखेड, करंजवण, वाघाड, पुणेगाव, दारणा, भावली, वालदेवी, नांदूरमधमेश्वर, कडवा, आळंदी, भोजापूर, चणकापूर, पूनद, हरणबारी, केळझर या धरणांतून मोठ्या प्रमाणावर नदीत पाणी सोडण्यात आले आहे. गंगापूर @ ७९ टक्केनाशिक शहरासह मराठवाड्याच्या पाण्याची गरज भागविणाऱ्या गंगापूर धरणात सध्या ७९ टक्के पाणी साठले आहे. या धरण समूहात येणाऱ्या कश्यपी धरणात ८७, तर गौतमी गोदावरीत ७० टक्के इतके पाणी आहे. गंगापूर धरण समूहात सध्या साठलेल्या पाण्यामुळे नाशिककरांची वर्षाची गरज पूर्ण झाली आहे. त्यामुळे नजिकच्या काळात धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग केल्याशिवाय पर्याय नाही. सायंकाळपर्यंत पाऊसनाशिक जिल्ह्णात सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण २६४ मिमी. पाऊस झाला आहे. यात नाशिक- ५०.५, इगतपुरी ७८.०, त्र्यंबकेश्वर २७.०, दिंडोरी- ३१, पेठ- ५४, निफाड १.६, सिन्नर ८.०, येवला २.४, कळवण १.५, सुरगाणा १०.४ मिमी. या प्रमाणे पाऊस झाला असून चांदवड, देवळा, नांदगाव, मालेगाव, बागलाण येथे निरंक पावसाची नोंद आहे.पुन्हा विसर्ग सुरूसायंकाळी ७ वाजता गंगापूर धरणातून सात हजार ९७४ क्युसेक, दारणामधून २८ हजार ४६६, पालखेडमधून ९००९, तर कडवा मधून ७८०० आणि वालदेवीतून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गोदावरी नदीतून सात हजार क्युसेक विसर्ग करण्यात येत असला तरी होळकर पुलाखाली ११ हजार २१० क्युसेक प्रवाह कायम आहे.