नाशिक : सदनिका स्वत:च्या नावावर करून देण्याच्या वादातून दोघा सावत्र मुलांवर सर्व्हीस पिस्तुलने गोळ्या झाडून आपल्या दोन्ही सावत्र मुलांना ठार मारणारा पोलीस कर्मचारी संशयित संजय भोये यास जिल्हा न्यायालयाने शुक्र वारपर्यंत (दि.२८) सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.पेठरोडवरील अश्वमेघनगर परिसरात असलेल्या राजमंदिर सोसायटीत भोये याने दोघा सावत्र मुलांवर पिस्तुलमधून चार गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उघडकीस शुक्रवारी (दि.२१) आली होती. या घटनेत अभिषेक उर्फ सोनू नंदिकशोर चिखलकर त्याचा भाऊ शुभम नंदिकशोर चिखलकर यांचा मृत्यू झाला होता. गोळ्या झाडल्यानंतर भोये स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाला होता. त्यास शनिवारी (दि.२२) न्यायालयात पोलिसांनी हजर केले होते. भोये हा उपनगर पोलीस ठाण्यात बीट-मार्शल म्हणून नोकरीला असताना भोये व त्याच्या पत्नीच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मयत सोनू आरि शुभम यांच्यात काही दिवसांपासून आजोबांनी आईला घेऊन दिलेला फ्लॅट नावावर करून देण्यासाठी वाद सुरू होते. काल शुक्र वारी सकाळी याच कौटुंबिक कारणावरून पुन्हा वाद निर्माण झाले. त्यावेळी भोये कामानिमित्त न्यायालयात होते तेथून घरी परतले असता वाद सुरूच होता. त्यावेळी दोघे मुले व भोये यांच्या पुन्हा शाब्दिक चकमक झाली. त्यातून अजून वाद वाढला त्यावेळी घरात पत्नी, मुलगी व स्नुषा होती. भांडण झाल्याने मुलगी खाली निघून गेली त्यावेळी संतप्त झालेल्या भोये याने पिस्तुलमधून दोघा मुलांवर ४ गोळ्या झाडल्या. सोनूच्या डोक्यात गोळी लागल्याने तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. तर शुभम हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी तत्काळ जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.या घटनेनंतर भोये हा स्वत: पंचवटी पोलीस ठाण्यात हजर होऊन सावत्र मुलांवर गोळ्या झाल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. यावेळी पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली. पोलिसांनी तत्काळ त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर तत्काळ पंचवटी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
मुलांच्या हत्त्येप्रकरणी सावत्र बापाला सात दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 6:54 PM
पेठरोडवरील अश्वमेघनगर परिसरात असलेल्या राजमंदिर सोसायटीत भोये याने दोघा सावत्र मुलांवर पिस्तुलमधून चार गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उघडकीस शुक्रवारी (दि.२१) आली होती.
ठळक मुद्देदोघा सावत्र मुलांवर पिस्तुलमधून चार गोळ्या झाडून हत्या