सटाणा : येथील नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे पहिले तीन दिवस निरंक गेले असताना, गुरुवारी चौथ्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी दोन, तर नगरसेवक पदासाठी पाच असे एकूण सात उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आले आहेत. नगरसेवक पदासाठी पहिला उमेदवारी अर्ज नगराध्यक्ष सुलोचना चव्हाण यांनी भरला. नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रि येला सुरुवात झाली असून, २४ आॅक्टोबरपासून सुरू असलेल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत एकाही उमेदवाराने अर्ज भरला नव्हता. अखेर गुरुवारी चौथ्या दिवशी सात अर्ज निवडणूक विभागाला प्राप्त झाले आहेत. थेट नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे यांनीच दोन अर्ज भरले आहेत. एक अर्ज त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून भरला, तर दुसरा अर्ज अपक्ष उमेदवारीसाठी भरला आहे. राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी कोणाला मिळते याबाबत उत्सुकता कायम आहे. नगरसेवकपदासाठी पाच अर्ज भरण्यात आले आहेत. नगराध्यक्ष सुलोचना चव्हाण यांनी (प्रभाग क्र . १० अ), अनिल सोनवणे प्रभाग क्र . ६ (अ), ललिता सोनवणे (प्रभाग क्र . ६ ब), शेख रशिदाबी मुख्तार (प्रभाग क्र . ९ क), सपना भांगडिया (प्रभाग क्र . ६ ब) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
सटाण्यात सात अर्ज दाखल
By admin | Published: October 27, 2016 11:47 PM