शहरात ऑक्टोबर महिन्यांनतर कोरोनाबाधितांची संख्या घटली आणि त्यामुळे कोरोना नियंत्रणात येऊ लागल्याचे चित्र होते. मात्र, १० फेब्रुवारीनंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने महापालिकेने थेट कारवाई सुरू केली आहे. शनिवारी तर एकाच दिवसात १२० जणांवर मास्क आणि सुरक्षित अंतराचे पालन न केल्याने दंड वसूल करण्यात आला आहे. यात पंचवटी विभागात ५२ जणांकडून १० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर सिडकोत २७ जणांकडून ५ हजार ४००, सातपूर येथे २१ जणांवर कारवाई करण्यात आली असून, नाशिक पूर्व विभागात १३ जणांकडून ७ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. नाशिक पश्चिममध्ये मात्र कमी म्हणजेच ७ जणांवर कारवाई करून १४० रुपयांचा दंड जमा करण्यात आला आहे. हा सर्व दंड एका वैद्यकीय सेमिनारमध्ये करण्यात आला. शहरात कालिका मंदिराजवळ एका हाॅटेलमध्ये वैद्यकीय विषयावरील चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी मनपाच्या पश्चिम विभागाच्या पथकाने तेथे जाऊन तपासणी केली असता सात जणांनी मास्क न घातल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
इन्फो...
वाढदिवस, साखरपुडा कार्यक्रम रडारवर
नाशिक शहरात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी आयुक्त कैलास जाधव यांनी विभागीय अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार दिले असून, त्यानुसार लग्नसोहळेच नव्हे, तर साखरपुडा, वाढदिवस, सेमिनार, मेळावे, तसेच अन्य सर्वच सार्वजनिक कार्यक्रम रडारवर असणार आहेत.