पाथर्डी शिवारातील गजानन नगर परिसरात विजेचा लपंडाव जणू काही नेहमीचाच बनला आहे.
कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून शासनाच्यावतीने शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले आहे. इंजिनिअरिंग व फार्मसी महाविद्यालयाच्या ऑनलाइन परीक्षा सुरू आहेत. शुक्रवार (दि २५) रोजी पहाटे चार वाजल्यापासून सुमारे सात तास सप्तशृंगी रो हाऊस, जोगेश्वरी रो हाऊस, उमंग साई अपार्टमेंटसह गजानन नगर परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे इंटरनेटचे राऊटर बंद झाल्यामुळे सकाळी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण आणि परीक्षेपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याने विद्यार्थी व पालक वर्गाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. पाथर्डी सब स्टेशनचा तक्रार करण्यासाठी असलेला मोबाईल नंबर नेहमीच बंद असतो. तसेच संबंधित अधिकाऱ्याला फोन केले असता उडवाउडवीचे उत्तर दिल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे
कोट : सकाळी आठ वाजता ऑनलाइन परीक्षा होती. परंतु विद्युत पुरवठा खंडित झाल्याने इंटरनेटचे राऊटर बंद झाल्याने संगणकही बंद झाले. त्यामुळे मोबाईलवर परीक्षा देतानाही अडचणी निर्माण झाल्या होत्या.
- ईश्वर पाटील पहिले,
विद्यार्थी )