मालेगाव : तालुक्यातील भायगाव येथील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसात पती, सासरा, सासू, चार नणंदा व तीन नंदई अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. संगीता विजय पाटील हिचा दवाखाना टाकण्यासाठी माहेरून ५० हजार रूपयांची मागणी केली होती. प्रथम वर्ग न्यायाधिश जे. डी. हुशंगाबादे यांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली. पीडित संगीता पाटील, नरेंद्र देवरे, संदिप देवरे, भिला देवरे यांची साक्ष तपासण्यात आली. साक्षीत तफावत आढळली. फिर्यादीच्या लग्नापूर्वी तिच्या तिन्ही नणंदा सासरी राहत होत्या. त्यांना संसार मोडण्याच्या हेतूने गुन्ह्यात गोवण्याचे दाखविण्यात आले. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना फिर्यादीचा पती विजय बच्छाव हा फरार होता तर सासरे भिला बच्छाव यांचा मृत्यू झाला होता. आरोपींतर्फे अॅड. निमिष मर्चंट यांनी काम पाहिले.
विवाहितेचा छळ केल्याच्या आरोपातून सात जणांची निर्दोष मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 4:32 PM
मालेगाव : तालुक्यातील भायगाव येथील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसात पती, सासरा, सासू, चार नणंदा ...
ठळक मुद्दे मालेगाव : तालुक्यातील भायगाव येथील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसात पती, सासरा, सासू, चार नणंदा व तीन नंदई अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.