शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

आराईजवळ अपघातात सात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:41 PM

सटाणा : शहरातील यात्रोत्सवात खेळणी विक्रीचा व्यवसाय करणाºया व्यावसायिकांच्या अ‍ॅपे रिक्षाला अज्ञात कंटेनरने जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत रिक्षाचालकासह सातजण जागीच ठार झाले. ही दुर्घटना गुरुवारी (दि.२ ८) सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास सटाणा - मालेगाव रस्त्यावरील आराई पांधीनजीक घडली. या दुर्घटनेमुळे यात्रोत्सवावर विरजण पडले असून, हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी अज्ञात कंटेनरवर अपघाताचा गुन्हा दाखल केला असून, फरार कंटेनरचा पोलीस शोध घेत आहेत.

ठळक मुद्देकंटेनरची अ‍ॅपे रिक्षाला धडक; सटाणा यात्रोत्सवावर शोककळा; व्यापाºयांचा स्वयंस्फूर्तीने बंद

सटाणा : शहरातील यात्रोत्सवात खेळणी विक्रीचा व्यवसाय करणाºया व्यावसायिकांच्या अ‍ॅपे रिक्षाला अज्ञात कंटेनरने जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत रिक्षाचालकासह सातजण जागीच ठार झाले. ही दुर्घटना गुरुवारी (दि.२ ८) सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास सटाणा - मालेगाव रस्त्यावरील आराई पांधीनजीक घडली. या दुर्घटनेमुळे यात्रोत्सवावर विरजण पडले असून, हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी अज्ञात कंटेनरवर अपघाताचा गुन्हा दाखल केला असून, फरार कंटेनरचा पोलीस शोध घेत आहेत.शहरातील यात्रोत्सवात खेळणी, पानठेला, घरगुती वापराचे साहित्य विक्री करणारे सातजण गेल्या मंगळवारी माल खरेदीसाठी मुंबईला गेले होते. बुधवारी माल खरेदी करून ते आरामबसने गुरुवारी पहाटे मालेगावला आले. मालेगावहून या व्यावसायिकांनी सकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास संजय पंधाडे यांची रिक्षा (क्र. एमएच ४१ व्ही १५५९) भाड्याने केली. मालेगावहून सटाण्याकडे येत असताना आराई पांधीनजीकच्या सुकड नाल्याच्या वळणावर समोरून बेदरकारपणे येणाºया अज्ञात कंटेनरने रिक्षाला जबरदस्त अज्ञात कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत रिक्षाचा चक्काचूर झाला. यात रिक्षाचालकासह सातही जण जागीच ठार झाले. दुर्घटना घडल्यानंतर येथील रुग्णवाहिकाचालक कल्पेश निकम मालेगावकडे जात असताना त्यांना अपघातातील मृतदेह दिसले. त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, उपनिरीक्षक कृष्णा घायवट, बाळासाहेब पाटील आणि पोलीस कर्मचाºयांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून रिक्षाचालकासह अपघातग्रस्तांना येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.व्यावसायिकांची रु ग्णालयात गर्दी...यात्रोत्सवात तीनशेहून अधिक व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. राज्यासह राजस्थान, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात व्यावसायिक येतात. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे व्यावसायिक दरवर्षी डिसेंबर ते मार्च हे चार महिने राज्यात ठिकठिकाणच्या यात्रेत दुकाने थाटतात. सालाबादप्रमाणे यंदाही एकत्रित दुकाने लावली. चार महिने एकत्र राहणाºया सहकाºयांवर क्रूर काळाने झडप मारून आपल्यातून हिरावून नेल्याने आज दोनशे ते अडीचशे व्यापाºयांनी येथील ग्रामीण रु ग्णालयात प्रचंड आक्र ोश केला. रुग्णालयातील गर्दी आणि आक्र ोशमुळे अनेकांना गहिवरून आले होते. दरम्यान, शेकडो कोस दूर व्यवसायासाठी आलेल्या सहकारी व्यापाºयांचे शव गावाकडे पोहोचविण्यासाठी आर्थिक मदत म्हणून यात्रेतील व्यापाºयांनी अवघ्या दहा मिनिटात सव्वा लाख रु पये जमा करून दिले, तर सटाण्यातील काही दात्यांनीदेखील ऐशी हजार रु पयांची मदत दिली. यामुळे नाशिक येथून अद्ययावत शववाहिका बोलावून उत्तर प्रदेशमधील व्यापाºयांचे मृतदेह गावाकडे रवाना केले.अनेक वर्षांच्या यात्रेचा साक्षीदार पानवाला बाबा हरपलाया दुर्घटनेत मरण पावलेल्या व्यापाºयांमध्ये रहेमतुल्ला पानवाला यांचा समावेश होता. रहेमतुल्ला हे यात्रेत बनारस पानवाला बाबा म्हणून परिचित होते. बनारसवाला पान लेलो भाई असे म्हणणारा पानवाला बाबा यात्रेकरूंचे एक आकर्षण होते. ते गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून सटाणा येथील यात्रोत्सवात आपला पान ठेला लावत. त्यामुळे ते सर्वांना परिचित होते. त्यांच्या या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. उत्तर प्रदेश करमपूरचे कैलास गुप्ता व राजेशकुमार गुप्ता हे दोघे मामा-भाचे होते. ते खेळणी विक्र ीचा व्यवसाय करीत. सटाण्यात गेल्या सहा वर्षांपासून दुकान लावत तर अन्य व्यापारी कटलरी व्यापारी होते. या दुर्घटनेत आपले सहकारी मित्र हरपल्याने गुरूवारी दिवसभर यात्रेतील व्यवसाय बंद ठेवून व्यापाºयांनी शोक व्यक्त केला. मृतांची नावेमृतांमध्ये रिक्षाचालक संजय पंधाडे (४०) रा. मालेगाव, व्यावसायिक अलीम शेख तायर (३४) रा.चोपडा, अशोक शंकर देवरे (५५) रा. अमळनेर, राजेशकुमार शंकरदास गुप्ता (२८), कैलास प्रसाद गुप्ता (४२), मोहम्मद लखन जल्लू (४५) तिघे राहणार करमपूर, तालुका तलझाडी, जिल्हा साहेबगंज (उत्तर प्रदेश), रहेमतुल्लाभाई गोहरआश्मी पानवाला (६३) रा. बनारस यांचा समावेश आहे.