नाशिक : दिवसा घराची टेहळणी करून रात्रीच्या वेळी घरफोडी करणाºया चौकडीला शहर पोलिसांच्या मध्यवर्ती युनिटने अटक केली आहे़ या चौकडीमध्ये एका अल्पवयीन गुन्हेगाराचाही समावेश असून, या सर्वांनी अंबड पोलीस ठाणे हद्दीतील पंधरा घरफोड्यांची कबुली दिली आहे़ त्यांच्याकडून ६ लाख ५० हजार १५० रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे़ दरम्यान, यामध्ये एका सराफाचाही सहभाग असल्याचे समोर आले असून, त्यास अटक करण्यात आली आहे़
सिडको परिसरात सातत्याने होत असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी दिले होते़ त्यानुसार गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती युनिटचे पोलीस उपनिरीक्षक भीमराव गायकवाड यांना अंबड परिसरात घरफोड्या करणाºया संशयितांची माहिती मिळाली होती़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, सहायक निरीक्षक सचिन सावंत यांच्या पथकाने अंबड परिसरातून संशयित गोटीराम लक्ष्मण भोये, गुरुदेव काळू खतेले (१९), सागर आत्माराम जगदाडे (१९, सर्व रा. चुंचाळे घरकुल योजना, अंबड) यांच्यासह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन चौकशी केली़ या चौघांनीही अंबड परिसरात १४ व इंदिरानगर परिसरातील एका घरफोडीची कबुली दिली़
पोलिसांनी या संशयितांकडून ५ लाख ४ हजार १५० रुपयांचे चोरीचे १६८ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३२ हजार रुपयांची चोरीची ८०० ग्रॅम चांदी, १ लाख रुपयांचा चार लॅपटॉप, १० हजार रुपयांचे २ कॅमेरे व ४ हजार रुपये रोख असा ६ लाख ५० हजार १५० रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे़ पोलीस हवालदार गोसावी, कर्डिले, गवळी, केदार, संजय गामणे, रेवगडे, दिवटे, रेखा गायकवाड, पवार यांचा या पथकात समावेश होता़
आणखी घरफोड्यांची उकलघरफोडीतील या चौघा संशयितांकडून साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चोरीचे सोने खरेदी करणाºया सराफ बाजारातील एका सोनारालाही अटक केली आहे. या संशयितांकडून शहरातील आणखी घरफोड्यांची उकल होण्याची शक्यता असून, शहरातील इतरही सोनारांवर आमची नजर आहे़- डॉ़ रवींद्र सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक.