दिंडोरी : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी २५ जुलै रोजी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल सात अर्ज दाखल झाले असून, उपनगराध्यक्षपदाचीही निवडणूक २५ तारखेला होणार आहे. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी या चारही पक्षांच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आले आहेत. नगराध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी पाच नगरसेवकांसह भाजपात प्रवेश केल्याने मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेल्या दिंडोरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष-पदाच्या निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी तब्बल सात अर्ज दाखल झाले.महिलांच्या खुल्या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पदासाठी रचना जाधव, विमल जाधव, मालती जाधव, निर्मला जाधव, सविता देशमुख व विद्यमान उपनगराध्यक्ष आशा कराटे यांनी मुख्य अधिकारी अनंत जवादवार यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केले. २५ तारखेला दुपारी २ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे.
दिंडोरी येथे नगराध्यक्षपदासाठी सात अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 1:00 AM