पंचवटी : ओझरकडून नाशिकला येणाºया बसच्या चालकाने आडगाव थांब्यावर बस थांबविली नसल्याने धावत्या बसमध्ये पळत चढण्याच्या प्रयत्नात सात विद्यार्थी तोल जाऊन पडल्याची घटना शुक्र वारी (दि. १५) सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर गावातील संतप्त नागरिकांनी बसचालकास मारहाण करत काहीकाळ बससेवा बंद पाडली होती. अखेर घटनास्थळी एसटीचे अधिकारी व पोलीस पथक दाखल झाल्यानंतर नागरिकांची समजूत काढल्यानंतर बससेवा पूर्ववत सुरू झाली. बसचालकाने बसथांब्यावर थांबविली नसल्यानेच हा प्रकार घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आडगावमधून नाशिकला नोकरी, शिक्षण, कामधंद्यासाठी मोठ्या प्रमाणात ये-जा करणारे प्रवासी आहेत. पूर्वी या मार्गावर मुबलक बस होत्या.जीवितहानी होता होता वाचलीआडगावातून अनेक विद्यार्थी तसेच नागरिक बसने प्रवास करतात. शुक्रवारी बसचालकाने थांब्यावर बस न थांबविल्याने विद्यार्थ्यांना धावत्या बसमागे पळावे लागले त्यामुळे अपघाताची घटना घडली. विद्यार्थी सावध असल्याने मोठा अपघात टळला. पुढच्या दरवाजाने विद्यार्थी बसमध्ये चढताना पडले असते तर त्यांना हकनाक जीव गमवावा लागला असता.काहीकाळ तणावाची परिस्थितीसकाळच्या सुमाराास आडगाव बसथांबा परिसरात ग्रामस्थांची वर्दळ असल्याने बसमधून विद्यार्थी पडल्याचे निदर्शनास येताच काही ग्रामस्थांनी त्या विद्यार्थ्यांना उचलले. त्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बसचालकाला मारहाण करत आडगावातून सय्यद पिंप्री, सायखेडा, ओझर, विंचूर गवळी, मोहाडीकडे जाणाºया या बसेस रोखून धरत अर्धा ते पाऊण तास बससेवा बंद पाडली. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सात विद्यार्थी बसमधून पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:50 AM