नाशिक : गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यात दहा हजारांहून अधिक बाधितांपैकी ७ हजार ३७० रुग्णांनी कोरोनाला पराभूत केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य:स्थितीत २ हजार ६०४ रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यात महापालिका क्षेत्रात १ हजार ५३५, ग्रामीणला ९७५ तर मालेगाव मनपा क्षेत्रात ८४ आणि जिल्हाबाह्य १० रुग्णांचा समावेश आहे.ग्रामीणमधील बाधितांच्या संख्येतही झपाट्याने उतार येत असून, ही दिलासादायक बाब आहे. मालेगावमध्ये सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या शंभरपेक्षाही कमी आहे. आतापर्यंतच्या एकूण ४२० बळींमध्ये महानगरपालिका क्षेत्रातून २२१ ग्रामीण ९८, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून ८३ तर जिल्हाबाहेरील १८ जणांचा समावेश आहे.४६०० जणांना डिस्चार्जबुधवारपर्यंत ज्या ७३७० बाधितांना रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यात महापालिका हद्दीतील रुग्णालयांतून ४६००, ग्रामीणमधून १५९४, मालेगाव १०५० तर जिल्हाबाह्य रुग्णांमध्येदेखील १२६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.२६०४ अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये १,३४४ मनपा क्षेत्रात, मालेगाव- ५९, ग्रामीणला ४५८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तालुका-२२५, सिन्नर -१४८, निफाड -१४७, इगतपुरी - १३७, नांदगाव -९६, दिंडोरी- ५६, येवला-४१, त्र्यंबकेश्वर- २८, बागलाण- २३, सुरगाणा -९, पेठ -३, कळवण-१ असे बाधितांचे प्रमाण आहे. गृह विलगीकरण अंतर्गत ५५४ जणांवर उपचार सुरू आहेत.
सात हजार बाधितांनी केला कोरोनाचा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 1:10 AM