नाशिक : नागरिकांना आॅनलाइन सातबारा उतारे मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. केवळ सहा तालुक्यांचे शिल्लक काम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. सातबारा उतारे मिळवण्यासाठी तलाठी कार्यालयात घालाव्या लागणाऱ्या चकरा बघता नागरिकांना घरबसल्या उतारे मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. आत्तापर्यंत इगतपुरी, देवळा, त्र्यंबकेश्वर, पेठ, बागलाण, चांदवड आणि येवला या तालुक्यांचे सातबारा उताऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. आता नाशिक, निफाड, मालेगाव, कळवण, सिन्नर, दिंडोरी या तालुक्यांतील मिळकतींच्या माहितीचे संकलन सुरू आहे. ते झाल्यानंतर आता १ एप्रिलपासून कोणत्याही तालुक्यातील उतारे नागरिकांना आॅनलाइन मिळू शकतील.
एक एप्रिलपासून सातबारा उतारे आॅनलाइन
By admin | Published: February 10, 2015 1:03 AM