नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर बनत चालले आहे. रविवारी (दि १९) कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय दिवसभरात तब्बल ३९८ नवीन बाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे.जिल्ह्यात कोरोनाचा कहर रविवारीदेखील कायम होता. महानगरात दिवसभरात तब्बल ३११ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. ग्रामीण भागातही बाधित आढळण्याचे प्रमाण कायम असल्याने आतापर्यंतच्या बाधितांची एकूण संखया ९४१९ वर पोहोचली आहे. या शिवाय रविवारी ११५० नवीन संशयित रूग्ण दाखल झाले आहेत.येवल्यात संशयितांचे नमुने प्रयोगशाळेत रवानायेवला शहरातील बाधितांच्या संपर्कातील ४१ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी आरोग्य यंत्रणेने घेतले होते. शहरातील कासार गल्लीतील ६७ वर्षीय पुरुषाचा नाशिक येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तालुक्यातील बाधितांची संख्या आता २०५ झाली आहे.च्याशिवाय ओझर येथे कोरोनाचाकहर सुरूच असून रविवारी सायंकाळपर्यंत५ नवीन रु ग्ण सापडले तर एचएएल मधील एका कामगाराचा नाशिक येथे खासगी इस्पितळात मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णसंख्या ७७ वर जाऊन पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे सात बळी; ३९८ नवीन बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 1:18 AM
जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर बनत चालले आहे. रविवारी (दि १९) कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय दिवसभरात तब्बल ३९८ नवीन बाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे.
ठळक मुद्देयंत्रणेच्या चिंतेत वाढ : मृतांची संख्या ३९०