सिडको : जुने सिडकोतील श्री साईनाथ मंदिराचा सातवा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यानिमित्त आयोजित दोन दिवसीय साई महोत्सवाची सांगता झाली. यावेळी, हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. जुने सिडकोतील शिवाजी चौक येथील श्री साईनाथ मंदिराच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त ओम साईनाथ ट्रस्टतर्फे दोन दिवसीय साई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गुरु वारी सायंकाळी साईनाथ मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्रीहरी महिला भजनी मंडळाच्या महिलांनी साई भक्तिगीते सादर केली. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महोत्सवानिमित्त साईनाथ मंदिरात आकर्षक सजावट, रोषणाई करण्यात आली होती. साई महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी ओम साईनाथ ट्रस्टचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रवीण तिदमे, किरण भांबेरे, विक्र म काळे, विकास चांदवडकर, अम्रितपालसिंग रेखी, अजय राय, स्वप्निल पांगरे, सुनील कोचर, प्रवीण मोरे, मनोज नारखेडे, रितेश राठोड, विवेक संघवी, शरद फडोळ, जिभाऊ सोनवणे यांच्यासह ट्रस्टच्या पदाधिकारी, सदस्य, साईभक्तांनी परिश्रम घेतले. जुने सिडको परिसरातून साई पालखी मिरवणूक काढण्यात आली. रस्त्यांवर सडा, रांगोळी करत महिलांनी पालखीचे स्वागत, पूजन केले. सिंहगर्जना ढोल पथक, हनुमान चौक महिला लेजीम पथक, नंदी नृत्य आदिवासी पथक, श्रीराम शिवकालीन मर्दानी खेळ आखाडा, पारंपरिक वाद्य यांच्या सहभागाने पालखी मिरवणूक आकर्षण ठरली. उपमहापौर प्रथमेश गिते, नीलेश चव्हाण, महेश बडवे, सचिन मराठे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, भगवान दोंदे, राकेश दोंदे आदी मान्यवरांनी साई मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. पारंपरिक वेशभूषा करून साईभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते.
जुने सिडकोतील श्री साईनाथ मंदिराचा सातवा वर्धापन दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 1:03 AM