महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.११) पार पडली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले आहेत. राज्य शासन समकक्ष वेतनश्रेणी लागू करण्यावरून महापालिकेत गेांधळ सुरू असला तरी गेल्याच महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दोन दिवसात शासनाकडे आदेश पाठवण्यास सांगण्यात आले होते; मात्र त्यानंतरही प्रशासनाची कार्यवाही संथ असून, पदोन्नतीचे कामदेखील रखडले आहेत. याबाबत शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी प्रशासन उपआयुक्त मनोज घेाडे पाटील यांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली, सध्याच्या सेवा ज्येष्ठता यादीमुळे ३१ डिसेंबरच्या आत पदाेन्नतीबाबत निर्णय हेाणे अपेक्षित आहे. नाही तर पुन्हा त्यात विलंब हेाईल, असे त्यांनी सांगितले. तर काँग्रेस पक्षाचे राहुल दिवे यांनी पदोन्नती नाकारून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप केला.
सभापती गणेश गीते यांनी याप्रकरणी प्रशासनाच्या गतीबाबत नाराजी व्यक्त केली; परंतु कर्मचाऱ्यांना येत्या १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश देण्याचे आदेश दिले आहेत. पदोन्नतीबाबतदेखील तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. त्याच बरोबर मनोज घेाडे पाटील यांच्या कामकाजाविषयी तक्रारी असल्याने त्यांना शासकीय सेवेत पुन्हा पाठवण्यासाठी आयुक्तांना पत्र देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.