गोरख घुसळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : राज्याच्या अर्थसंकल्पात महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत बदल करून दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाºया शेतकºयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.दोन लाखांवरील कर्ज रक्कम भरल्यास शेतकºयांचे दोन लाख रु पये कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निकषानुसार येवला तालुक्यातील दोन हजार सातशे पात्र लाभार्थी शेतकºयांना सुमारे सत्याहत्तर कोटी रु पयांचे अनुदान मिळणार आहे. नियमितकर्ज भरणाºया शेतकºयांना पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार असल्याने पात्र शेतकºयांना सुमारे १० कोटी ४९ लाखांचे अनुदान मिळणार असल्याची माहिती तहसीलदार रोहिदास वारुळे व सहायक निबंधक एकनाथ पाटील यांनी दिली आहे. राज्यातील शेतकºयांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वतीने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत असून, दोन लाख रु पयांपर्यंत कर्ज असलेल्या येवला तालुक्यातील सुमारे १८ हजार ४३८ शेतकºयांना सुमारे दोनशे कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे.गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकºयांनी दुष्काळी स्थितीचा सामना करीत शेती कसली आहे. मात्र त्यात त्यांना नेहमीच नुकसान सोसावे लागल्याने अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने ते कर्जबाजारी झाले आहेत. महाविकास आघाडीने शेतकरी हिताचा निर्णय घेतला असून, या निर्णयाने शेतकºयांना मोठा दिलासा मिळणार आहे.- राजेंद्र गायकवाड, शेतकरी, कासारखेडेयेवल्यात नियमित कर्ज भरणारे सुमारे १०३८ लाभार्थी शेतकरी असून, त्यांना शासनामार्फत सुमारे १० कोटी ४९ लाख रु पयांचे अनुदान दिले जाणार आहे. या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. येवला तालुक्यातील दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेले दोन हजार सातशे दहा पात्र लाभार्थी शेतकरी असून, आजमितीस सुमारे ७६ कोटी ५८ लाख १९ हजार रु पयांची थकबाकी आहे. पात्र शेतकºयांना दोन लाखांवरील २२ कोटी ३८ लाख रु पयांची रक्कम भरावी लागणार आहे. शासनाकडून कर्जमाफीच्या लाभापोटी ५४ कोटी वीस लाख रु पये अनुदान मिळणार आहे. तर नियमित कर्ज भरणाºया पन्नास हजार रु पयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. नव्याने कर्ज उपलब्ध न झाल्याने समाधानगेल्या काही वर्षांपासून राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे शेतीशी निगडित कर्जाची रक्कम तो फेडू शकला नाही. त्यामुळे शेतकºयांना शेतीसाठी नव्याने कर्ज उपलब्ध न झाले नाही. महाविकास आघाडीने राबविलेली महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे शेतकºयांना दिलासा मिळणार आहे.
शेतकऱ्यांना मिळणार सत्याहत्तर कोटींचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 12:27 AM
पाटोदा : राज्याच्या अर्थसंकल्पात महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत बदल करून दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाºया शेतकºयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
ठळक मुद्देअर्थसंकल्पात दिलासा : येवला तालुक्यात २७०० लाभार्थी