देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरातला निसर्ग सौंदर्याने नटलेल्या टाकेहर्ष येथील हरिहर गडावर जिद्दीच्या जोरावर तरु णांना लाजवेल असा पराक्र म 79 वर्षीय आजीबार्इंनी चढाई केली आहे. आपल्या पाच वर्षांच्या नातवासह आजीबाईने हरिहर किल्ला सर केला. गड किल्ल्यांच्या दुनियेत भटकंती अथवा फेरफटका मारल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला एक वेगळीच ऊर्जा मिळते. अशीच ऊर्जा घेऊन आनंदवली येथील रहिवासी आशा अंबाडे यांनी गिर्यारोहकांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगावपासून दहा किमी अंतरावर आणि बाह्मगिरीच्या पश्चिमेस वसलेला हरिहरगड हा प्राचीन काळातील किल्ला समुद्रसपाटीपासून 1120 मीटर उंचीचा उभा असलेला त्रिकोण आकाराचा किल्ला आहे. मात्र, अंबाडे आजींनी कुटुंबीयांसमवेत कुठलाही आधार न घेता न डगमगता गडाची चढाई चार तासांत सर केली. लॉकडाऊन काळात दररोज प्राणायाम, योगा करत आजींनी स्वत:ला तंदुरु स्त ठेवले आहे. किल्ल्यावरील अनेकांना आजीसमवेत सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही.किल्ला सर करताना मनात कुठलीही भीती नव्हती. निसर्गाच्या कुशीत असणार्या या किल्ल्याच्या चढाईने स्वर्गसुखाची प्राप्ती झाल्याची प्रचिती येऊन जिवंतपणीच स्वर्ग अनुभवायला मिळाला. पहिल्यांदाच एवढा उंच किल्ला सर करत असताना थकवा देखील जाणवला नाही. माझ्यासोबत साडेपाच वर्षीय नातू मृगांश होता. अनेकांनी आमचे तोंड भरून कौतुक केले. हरिहर किल्ला सरतेवेळी अनेक ठिकाणी माकडे, आजूबाजूला रंगबेरंगी फुले, दाट हिरवळ यामुळे संपूर्ण आसमंत एक झाला असे भासत होते.- आशा अंबाडे, गिर्यारोहक, आनंदवली.