उपनगर परिसरात गस्तीची मागणी
नाशिक: टाकळी तसेच उपनगर परिरसरात वाढणाऱ्या चोरीच्या घटना लक्षात घेता, या भागात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. रात्रीच्या सुमारास सोसायटी, कॉलनी परिसरात अनोळखी टवाळखोरांचा उपद्रव वाढला असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
महात्मा गांधी मार्गावर विस्कळीत पार्किंग
नाशिक: शहरात पार्किंगची समस्या कठीण झालेली असताना वर्दळीच्या महात्मा गांधी रस्त्यावरील अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. या मार्गावर दुतर्फा दुकाने असून येणारे ग्राहक दुचाकी अडकून पडू नये म्हणून रस्त्याच्या जवळच दुचाकी उभी करतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे.
रविवार कारंजावर रिक्षांचा अडथळा
नाशिक: रविवार कारंजाकडून मेनरोडकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक रिक्षाचालक रस्त्यातच प्रवासी भरण्यासाठी उभे राहत असल्याने कोंडीत भर पडत आहे. अगोदरच या संपूर्ण मार्गावर ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. त्यातच रिक्षाचालक रस्त्यातच वाहने उभी करीत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते.
आरटीओ कॉर्नरला टवाळांचा उपद्रव
नाशिक: आरटीओ कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या परिरसरात गेल्या काही दिवसांपासून टवाळखोरांचा उपद्रव वाढला आहे. दिवसाढवळ्या मद्य प्राशन करीत दुचाकीवर आरडोओरड करीत शांतता भंग करीत असल्याच्या तक्रारी होत आहेत. पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.