नाशिक : इगतपुरी तालुक्यातील पेहरेवाडी येथील शिक्षक वर्षभरापासून गैरहजर असतानाही तो बदलीप्रकियेत पात्र ठरविण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या आॅनलाइन शिक्षक बदलीप्रक्रियेतील अनागोंदी कारभार समोर आला आहे. शिक्षक बदली आॅनलाइन असल्याने चुकीच्या बदल्यांची शक्यता फेटाळून लावणाºया जिल्हा परिषदेकडे अजूनही ढीगभर तक्रारी असतानाही शिक्षण विभाग मात्र बचावात्मक भूमिका घेत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे.राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षकांसाठी राबविलेली बदलीप्रक्रिया अनेकविध कारणांमुळे वादग्रस्त ठरली आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांवर गैरप्रकाराविषयी आरोपदेखील करण्यात आले. बदलीसाठी शिक्षकांकडून चुकीची माहिती भरण्यात आल्यानंतरची सुमारे ११२ प्रकरणे सप्रमाण जिल्हा परिषदेकडे सादर करूनही जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांनी यामध्ये कपात करीत फक्त ८२ प्रकरणांवर संशय व्यक्त केला. नंतरच्या काळात तर केवळ २२ प्रकरणेच तपासण्यात आली.विशेष म्हणजे वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये घोळ घालणाºया यंत्रणेनेच्या प्रमाणपत्रांची तपासणी केल्यामुळे या प्रकरणातीलसत्यता दडून राहिली. त्यामुळे गैरप्रकाराची उघड चर्चा आणि कागदपत्रे शिक्षण विभागाच्या हाती देऊनही यातून अपेक्षित चौकशी होऊ शकली नाही.जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी आॅनलाइन प्रक्रि या राबविताना ट्रान्स्फर पोर्टल हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. जिल्ह्णातील बदलीपात्र प्राथमिक शिक्षकांना बदलीसाठी २० आॅनलाइन विकल्प देण्यात आले होते. परंतु हे विकल्प भरताना शिक्षकांनी शासनाची फसवणूक केली. विशेष म्हणजे शिक्षकांनी बदलीसाठीचे गाव आणि शाळा ‘सिलेक्ट’ केल्यानंतर ते लॉक होणे अपेक्षित असताना तो पर्याय खुलाच राहिला आणि त्यामुळे अनेक शिक्षकांनी तोच तोच आॅप्शन निवडला. हा तांत्रिक दोषही शासनाने मान्य केला नाही.जिल्हा परिषदेनेदेखील काही तांत्रिक दोष मान्य केले. विशेष म्हणजे चुकीच्या बदल्या शोधून देण्याचे काम इतर शिक्षकांनीच करावे याच मानसिकतेतून जिल्हा परिषदेने चुकांकडे दुर्लक्ष केले आणि संशयास्पद शिक्षकांचे आक्षेप अमान्य करीत त्यांना प्रक्रियेत कायम ठेवणाºया शिक्षण विभागातील अधिकाºयांवर कोणतीही कारवाई होऊ शकलेली नाही. ते शिक्षक न्यायालयातचुकीची माहिती भरून बदलीचा लाभ मिळविल्याप्रकरणी ज्या नऊ शिक्षकांवर कारवाई करण्यात आली होती त्या शिक्षकांनी न्यायालयातून स्थगिती मिळविली आहे. या शिक्षकांच्या कागदपत्रांची म्हणे पुन्हा तपासणी होणार आहे. बदलीनंतरही गैरहजर राहणाºया शिक्षकांवर कारवाई करण्यात आलेली नाही तर गैरहजर असतानाही अशा शिक्षकांना अभय मिळत असल्याची चर्चा आहे.थेट कारवाई का नाही?इगतपुरी येथील बदल्यांमधील गैरप्रकार प्रकरणी मुख्याध्यापक आणि गटशिक्षण अधिकाºयांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. या आदेशाविषयीदेखील चर्चा असून, मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी थेट कारवाई का केली नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.
शिक्षक बदल्यांमधील गैरप्रकारावर शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 1:28 AM
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील पेहरेवाडी येथील शिक्षक वर्षभरापासून गैरहजर असतानाही तो बदलीप्रकियेत पात्र ठरविण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या आॅनलाइन शिक्षक बदलीप्रक्रियेतील अनागोंदी कारभार समोर आला आहे. शिक्षक बदली आॅनलाइन असल्याने चुकीच्या बदल्यांची शक्यता फेटाळून लावणाºया जिल्हा परिषदेकडे अजूनही ढीगभर तक्रारी असतानाही शिक्षण विभाग मात्र बचावात्मक भूमिका घेत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे.
ठळक मुद्देजिल्हा परिषद : शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना मात्र अभय