समजून वागण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोनाची दुसरी लाट अत्यंत घातक असूनही मार्चअखेरपर्यंत त्याचे गांभीर्य नागरिकांना जाणवलेच नव्हते, असे वाटते. मात्र, आता तरी या लाटेची तीव्रता समजून घेत प्रत्येकाने अत्यंत दक्षतेने घरात आणि घराबाहेर वावरण्याची गरज आहे.
कोरोनाशी लढताना आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आलेला आहे. दररोज जाणवणारी ऑक्सिजनची कमतरता ही रुग्णांइतकीच आरोग्य व्यवस्थेतील प्रत्येकाच्या चिंतेचे कारण ठरली आहे. अशा परिस्थितीत तरी नागरिकांनी स्वत: मास्क, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझरचे सूत्र सातत्याने लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्याशिवाय प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या सायट्रस फ्रूटचा देखील आहारात समावेश केल्यास त्यातून फायदा होऊ शकतो. गत वर्षाच्या तुलनेत यंदाची लाट खूपच अधिक परिणामकारक आहे, याचे भान प्रत्येक नागरिकाने ठेवायला हवे. यापेक्षा अधिक वाईट परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व ठिकाणची आरोग्य यंत्रणा कोलमडून पडू शकते. या सर्व बाबींचा विचार प्रत्येक नागरिकाने करणे आवश्यक आहे.
इन्फो
कोणत्याही प्रकारे आपल्याला साधे आजारपण देखील येणार नाही, ही दक्षता बाळगण्याची गरज आहे. त्यामुळेच दाखल रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णालयांजवळ विनाकारण थांबणे, अनावश्यक घराबाहेर पडणे देखील टाळावे. सध्या प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात राहणे हाच सुरक्षित राहण्याचा पर्याय आहे.
डाॅ. प्रसाद मुगळीकर, सीईओ, अपोलो हॉस्पिटल्स
फोटो
३०डॉ. मुगळीकर