कैलास बागुल हा बोर्डर सेक्युरेटी फोर्स ( बी.एस.एफ. ४ बी.एन. ) पुणे येथे २००३ मध्ये ते भरती झाले होते. काही दिवसापुर्वी आजारी असल्याने त्यांच्यावर चांदवड , नाशिक व पुणे येथे उपचार सुरु असतांना ते दि.२५जानेवारी रोजी मरण पावला त्यांचा मृतदेह शासकीय पध्दतीने चांदवड येथे आणण्यात आला.त्यांची शहीद जवान म्हणून अंत्ययात्रा चांदवड शहरातुन काढण्यात आली.यावेळी आमदार डॉ.राहुल अहेर,नायब तहसीलदार एस.पी.भादेकर, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील,उपनिरीक्षक गजानन राठोड यांनी पुष्पचक्र अर्पण केले.तर लष्कराचे कर्नल गोपाल किरसन यांच्या चमुने हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडून जवान कैलास बागुल यास मानवंदना दिली. तर भारताचा ध्वज माता मंगलबाई यांच्या स्वाधीन केला. यावेळी आई व नातलंगानी एकच हबंरडा फोडला. यावेळी नगराध्यक्ष नगराध्यक्ष रेखा गवळी, नगरसेवक कविता उगले, देवीदास शेलार , अल्ताफ तांबोळी, अशपाक खान, महेश खंदारे,विशाल ललवाणी, डॉ. नितीन गांगुर्डे, दत्तात्रय राऊत,संदीप उगले परिसरातील नागरीक उपस्थित होते.
एस.एफ.जवान कैलास बागुल यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 3:38 PM
चांदवड - येथील संत गाडगेबाबा चौकातील रहिवासी बी.एस.एफ. जवान कैलास भाऊसाहेब बागुल (३०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. चांदवडच्या अमरधाममध्ये लष्करी इतमामात हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडून शोककुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अत्यंसस्कार करण्यात आले.
ठळक मुद्देत्यांच्या पश्चात आई मंगलबाइर्, वडील भाऊसाहेब, दोन भाऊ महेश व अमोल तसेच पत्नी असा परिवार आहे. कैलास बागुल हा काही दिवसापासून आजारी असल्याने त्याचेवर उपचार सुरु होते. तो. पुणे येथे मिलटरी रुग्णालयात उपचार घेत असतांना मरण पावला त्याचेवर दि. २६ जानेवारी रोजी