शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

एस.जी. पब्लिक स्कूलमध्ये मुख्याध्यापकांची कार्यशाळा

By admin | Published: July 02, 2014 9:26 PM

एस.जी. पब्लिक स्कूलमध्ये मुख्याध्यापकांची कार्यशाळा

सिन्नर : ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत येथील मााध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या एस.जी. पब्लिक स्कूलमध्ये तालुक्यातील मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांची कार्यशाळा पार पडली.नाशिक जिल्हा परिषद व तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने या संस्थेचे संचालक अण्णासाहेब गडाख यांच्या अध्यक्षतेखाली एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गटविकास अधिकारी सुनील अहिरे यांनी शालेय परिसर, इमारतीचे बांधकाम, शालेय पोषण आहार, शालेय व्यवस्थापन, शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा, शैक्षणिक साहित्य, क्रीडांगण या संदर्भात येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. अण्णासाहेब गडाख यांनी संस्थेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या उपाय-योजनांची माहिती देतानाच शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी तालुक्यातील कार्यशाळा, उद्बोधन वर्ग, प्रशिक्षण वर्ग यासाठी संस्थेच्या वतीने मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. कार्यशाळेत प्रारंभी मुख्याध्यापक आर. बी. एरंडे यांनी स्वागत केले. पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी कार्यशाळेचा हेतू सांगितला.या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे संचालक विजय गडाख, राजेश गडाख, सचिव दौलतराव मोगल, मूल्यांकन समितीचे सदस्य अशोक महालपुरे, शिक्षणतज्ज्ञ पी. बी. हिंगमिरे, शिक्षण विस्तार अधिकारी आर. बी. लहामगे, एस. एस. निकम, श्रीमती डी.वाय. कुवर, श्रीमती एस. बी. कोठावदे, डी. जी.पवार, मुसळगाव केंद्रप्रमुख सुजाता देसले आदिंसह तालुक्यातील मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख उपस्थित होते. एम.जी. सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. पी. एस. सोमवंशी यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी ए. डी. बस्ते, आर. डी. रौंदळ, आर. एच. सोनवणे, एस. आर. कुऱ्हाडे, एस. जी. पगार, बी. के. काळोखे, श्रीमती एस. बी. गजभार आदिंनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)