शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

रोकडोबा पारावरील वटवृक्षाची सावली हरपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 1:27 AM

पुराच्या पाण्याचा वेढा, वाढलेला पर्णसंभार...पारंब्यांचा हरविलेला आधार आणि वयाची पूर्ण झालेली शंभरी यामुळे गोदाकाठावरील रोकडोबा व्यायामशाळेला लागून असलेल्या ‘रोकडोबा पारा’वरील वटवृक्ष मंगळवारी (दि.१०) दुपारी अचानकपणे उन्मळून पडला. यामुळे या पारावरील वटवृक्षाची सावली हरपली.

नाशिक : पुराच्या पाण्याचा वेढा, वाढलेला पर्णसंभार...पारंब्यांचा हरविलेला आधार आणि वयाची पूर्ण झालेली शंभरी यामुळे गोदाकाठावरील रोकडोबा व्यायामशाळेला लागून असलेल्या ‘रोकडोबा पारा’वरील वटवृक्ष मंगळवारी (दि.१०) दुपारी अचानकपणे उन्मळून पडला. यामुळे या पारावरील वटवृक्षाची सावली हरपली.रोकडोबा पार हा जुन्या नाशकातील जुुना पार आहे. बुधवारचा आठवडे बाजार आणि ज्येष्ठांच्या रंगणाºया गप्पांचा इतिहास या पाराभोवती फिरतो. पारावर गणपती मंदिर असून, भाविकांचे श्रद्धास्थान आहे. काही वर्षांपूर्वी पाराचे मजबुतीकरण करण्यात आले होते. या पाराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पारावर वड, पिंपळ यांची एकत्रित झालेली वाढ. पाराभोवती दोन पिंपळ व एक डेरेदार वटवृक्ष वाढलेले होते. त्यापैकी वटवृक्ष उन्मळून पडला. त्यामुळे जीर्ण व धोकादायक झालेला पिंपळाचा एक वृक्षही जो वटवृक्षासोबत वाढलेला होता तोदेखील सुरक्षितततेच्या दृष्टिकोनातून काढून घेतला गेल्याची माहिती नगरसेवक शाहू खैरे यांनी दिली. दुपारी वटवृक्ष पडल्याची माहिती तत्काळ पंचवटी अग्निशामक दलाला कळविण्यात आली. झाडांच्या फांद्यांखाली दोन रिक्षा दाबल्या गेल्याने नुकसान झाले. सुदैवाने कुठलाही अनर्थ झाला नाही.