शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग तिथे 'सेटिंग' का होत नाही?"; बाबा आढावांना सदाभाऊ खोतांचा सवाल
2
लग्नानंतर नवदाम्पत्याला घेऊन देवदर्शनाला गेले; परतताना भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
3
गर्लफ्रेंडने ५९०० कोटी रुपये कचऱ्यात फेकले; बॉयफ्रेंड पस्तावला, ती म्हणतेय त्यानेच सांगितलेले...
4
Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य:'या' राशींच्या व्यक्तींच्या विवाहास अनुकूल काळ; व्यवसायात भरभराट होईल, आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले
5
Kash Patel: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! भारतीय वंशाचे काश पटेल FBI चे नवे संचालक
6
EPFO चा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! या मेंबर्ससाठी आधार सीडिंगची अट हटवली
7
मंत्रिपदांचे वाटप अद्याप गुलदस्त्यात; शपथविधी ५ डिसेंबरलाच, भाजपचा नेता ३ ला निवडणार
8
अतिवेग अन् चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानेच अपघात; आरटीओच्या प्राथमिक चौकशीत पुढे
9
LPG Price Hike: महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! एलपीजी सिलिंडर महागला
10
माहिती नष्ट केल्याने फेर मोजणीसाठी दुसरीच यंत्रे; आमदार जितेंद्र आव्हाड यांचा दावा
11
अनिल परब यांच्यासह ४८ जण निर्दोष मुक्त; राणे यांच्या सेना त्यागानंतरची धुमश्चक्री
12
"EVM वर विश्वास नाही, तर राजीनामा द्या"; राहुल गांधी-प्रियांका गांधींवर भाजपचा हल्ला
13
हिंदुंवरील अत्याचार त्वरित थांबवा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बांगलादेशातील सरकारला आवाहन
14
‘त्या’ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षकांचीच! बॉन्डवर हमीपत्र दिल्यानंतरच आता सहलीला परवानगी
15
"मालिकेचा प्रवास आज थांबला, पण तो संपलेला नाही कारण...", 'आई कुठे...' संपल्यानंतर अरुंधती नेमकं काय म्हणाली?
16
Today Daily Horoscope: आर्थिक लाभाची शक्यता; जाणून घ्या तुमचं राशी भविष्य
17
छोटे पक्ष, अपक्षांना मतदारांनी केले हद्दपार; मुंबईत मोठ्या पक्षांचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध
18
‘ते’ लोकशाहीचे संकेत पाळत नाहीत; प्रियांका गांधी यांची टीका, दोन दिवसांच्या वायनाडच्या दौऱ्यावर
19
चेष्टा सहन न झाल्याने मित्राने केले तरुणावर कात्रीने सपासप वार; उपचारादरम्यान मृत्यू
20
दक्षिणेत चक्रीवादळ, उत्तरेत गारठा; पुडुचेरीनजीक ‘फेंगल’ धडकल्याने मुसळधार पाऊस; रस्ते, हवाई वाहतूक विस्कळीत

नेमिनाथ जैन विद्यालयात शाडू माती गणेशमूर्ती कार्यशाळा

By admin | Published: August 30, 2016 12:02 AM

नेमिनाथ जैन विद्यालयात शाडू माती गणेशमूर्ती कार्यशाळा

चांदवड : येथील नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयात शाडू मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्ती पर्यावरणपूरक असल्याने पर्यावरणाचे नुकसान होणार नाही हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कार्यशाळा घेण्यात आली. यात १२१ विद्यार्थ्यांनी आपली स्मरणशक्ती, कल्पकता व कौशल्याचा वापर करून मातीच्या गोळ्यापासून गणेशमूर्तींचा पाट तयार करून, मूर्तींचे विविध अवयव तयार करण्यात आले. नंतर बांबूच्या कोरण्याचा वापर करून मूर्तींना सुबक आकार देत उत्साहात काम करून आकर्षक गणेशमूर्ती तयार केल्या. कलाशिक्षक के. व्ही. अहिरे यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवून मार्गदर्शन केले, तर प्राचार्य यू. बी. कुलकर्णी यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती व पर्यावरण रक्षणाचे महत्त्व सांगितले. कार्यशाळेसाठी हरित सेना विभागप्रमुख आर. एन. नेरकर, एन. एन. निकम, ग्रंथपाल पी. व्ही. गोऱ्हे, आर. पी. चव्हाण, उपमुख्याध्यापक एस. यू. समदडिया, पर्यवेक्षक एम. टी. सोनी, विभागप्रमुख सी. डी. निकुंभ आदि उपस्थित होते.वाहेगाव साळ येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात साकारल्या गणेशमूर्ती तळेगाव रोही : तालुक्यातील वाहेगाव साळ येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारण्याची कार्यशाळा घेण्यात आली. कलाशिक्षक व्ही. जे. खैरनार यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले, तर विद्यार्थ्यांनी गणेशाची अनेक रूपे साकारली. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. शिक्षक व्ही. डी. पाटील, एस. एम. जाधव यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक के. डी. देवढे यांनी या उपक्रमाबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले.