महानिर्मिती राज्य नाट्य स्पर्धानाशिक : काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे माणसातील सहा षड्रिपु असून त्यांच्यामुळे आयुष्यात दु:ख, वैफल्य आणि निराशा येते़ या सर्वांमधून बाहेर पडण्यासाठी माणूस सुखाचे स्वप्न पाहतो आणि त्यासाठी आयुष्यभर धडपडत राहतो, प्रसंगी तडजोडही करतो़ मात्र या षड्रिपुंच्या चक्रव्यूहात माणूस कसा फसत जातो याची कथा भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राने बुधवारी (दि़२८) कालिदास कलामंदिरात सादर केली़ नितीन गगे या लेखकाने लिहिलेल्या या नाटकात वासू या तरुणाची कथा साकारण्यात आली आहे़वासू नावाचा तरुण सुखाचे स्वप्न पाहतो़ आईवरचे प्रेम व सुखी आयुष्यासाठी तो तडजोडीचा मार्ग स्वीकारतो़ वासूला पडलेल्या विचित्र स्वप्नापासून नाटकास सुरुवात होते. या स्वप्नाच्या अर्थप्राप्तीतून नाटकाचा शेवट होतो़ परिस्थितीच्या चक्रव्यूहातून सुटण्यासाठी आत्मविश्वास, सकारात्मक विचार आवश्यक असल्याचा संदेश हे दोन अंकी नाटक देते़या नाटकामध्ये नितीन देवरे (वासू), पंकज सनेर (साधू), चंद्रकांत सपकाळे (ज्योतिषी), हर्षवर्धन बिलगये (तरुण), श्रद्धा कदम (आई), पंकज गायकवाड (व्यक्ती), ऐश्वर्या खोसे (देवकी), सचिन शिंदे (सदा), शामला जाधव (सावली) तर चंद्रकांत जाडकर यांनी देवदूताची भूमिका साकारली़ या नाटकाचे दिग्दर्शन व नेपथ्य चंद्रकांत जाडकर यांचे तर प्रकाशयोजना - अतुल बºहाटे, संगीत - संतोष वारुंगसे, रोशन भगत, वेशभूषा व रंगभूषा - श्रद्धा कदम, तर नृत्य - शीतल जुमळे, स्वप्नाली मैंद, सविता शर्मा, प्रियंका बुरड, लक्ष्मी पाटील यांचे होते.आजचे नाटक : पारध , वेळ : सकाळी १० वाजता, नाटक : गेट वेल सून, वेळ : दुपारी ४ वाजताज्ञानप्राप्तीसाठी धडपडणारे ‘अश्वत्था’सायंकाळच्या सत्रात परळी औष्णिक विद्युत केंद्रातर्फे नितीन गगे लिखित व दिग्दर्शित ह्यअश्वत्थाह्ण हे नाटक सादर झाले. ज्ञानप्राप्तीसाठी धडपडणाऱ्या नायकाची कथा त्यातून मांडण्यात आली. अनेक रूपकात्मक प्रसंगांतून नायकाला होणारे ज्ञानप्राप्तीचे प्रतीकात्मक दर्शन त्यातून घडले. प्रसाद निर्मळे, सोनाली डोंगरे, ईशिता देशपांडे, गायत्री सिद्धेश्वर, स्वाती जेटीथोर, विनोद सातपुते, महेश होनमाने, स्वप्नील गवई यांनी भूमिका साकारल्या. नेपथ्य सुहास बाºहे, प्रदीप भुक्तर, रंगमंच व्यवस्था - हेमंत झाडे, कल्पेश कदम, प्रकाशयोजना - मिलिंद चन्ने, नवनाथ पाटील, तर संगीत - दिनेश कदम, नीलेश मुळे यांचे होते.
सकारात्मक विचार करण्यास भाग पाडणारे ‘षड्रिपु’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:43 AM