देवळा : देशाच्या रक्षणासाठी जवान दिवसरात्र जागतात म्हणून आपण सर्व सुखाने झोपू शकतो. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी स्वीकारणे, हे आपलेही कर्तव्य आहे. याच कृतज्ञ भावनेतून शहीद जवान रावसाहेब सोनजे यांचा मुलगा प्रितम याचे पालकत्व स्वीकारून त्याच्या पुढील शिक्षणाचा खर्च आपण स्वत: करणार असल्याचे प्रतिपादन नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष केदा नाना अहेर यांनी केले.देवळा तालुक्यातील वाखारी येथील शहीद जवान रावसाहेब सोनजे यांचे ग्रामपंचायत आवारात उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रावसाहेब सोनजे यांच्या स्मृती जिवंत राहाव्यात व पुढील पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी गावाने केलेल्या या उपक्र माचे त्यांनी कौतुक केले. लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आई हिराबाई सोनजे, पत्नी आशाबाई सोनजे, मुलगा प्रीतम सोनजे, भाऊ भाऊसाहेब सोनजे, श्रावण सोनजे, वाखारीचे सरपंच राहुल पवार, उपसरपंच डॉ. संजय शिरसाठ, नितीन ठाकरे, रतन पवार, रविंद्र चव्हाण, प्रताप ठाकरे, विलास आहेर, राकेश ठाकरे, दीपक आहेर, पंकज ठाकरे, रमण खरे, रत्ना पवार, विलास पवार, विमल अहिरे, ग्रामसेवक एन. पी. सूर्यवंशी यांचेसह पंचक्र ोशीतील आजी-माजी सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी शहीद सोनजे यांना मानवंदना दिली.
शहीद जवान रावसाहेब सोनजे स्मारकाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 4:19 PM
वाखारी : अहेर यांनी स्वीकारले मुलाचे पालकत्व
ठळक मुद्देरावसाहेब सोनजे यांच्या स्मृती जिवंत राहाव्यात व पुढील पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी गावाने केलेल्या या उपक्र माचे कौतुक