शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

शहीद निनादवर होणार आज अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 12:23 AM

नाशिक : जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात विमान दुर्घटनेत शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांचे पार्थिव रात्री हवाई दलाच्या विशेष विमानाने ओझर विमानतळावर आणण्यात आले असून, शुक्रवारी सकाळी दहा वाजता नाशिक अमरधामनजीकच्या मोकळ्या मैदानात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, लखनऊ येथे असलेले निनाद यांचे कुटुंब गुरुवारी दुपारी नाशकात निवासस्थानी परतले असून, निनादचे नातेवाईक, हितचिंतक, मित्रमंडळींसह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

ठळक मुद्देविशेष विमानाने ओझरला आगमन : पुष्पचक्र अर्पण

नाशिक : जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात विमान दुर्घटनेत शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांचे पार्थिव रात्री हवाई दलाच्या विशेष विमानाने ओझर विमानतळावर आणण्यात आले असून, शुक्रवारी सकाळी दहा वाजता नाशिक अमरधामनजीकच्या मोकळ्या मैदानात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, लखनऊ येथे असलेले निनाद यांचे कुटुंब गुरुवारी दुपारी नाशकात निवासस्थानी परतले असून, निनादचे नातेवाईक, हितचिंतक, मित्रमंडळींसह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.श्रीनगरनजीकच्या बडगाम जिल्ह्यात बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली होती, त्यात मूळ नाशिकचे रहिवासी असलेले स्क्वॉड्रन लिडर निनाद मांडवगणे यांच्यासह एअर फोर्सचे सहा अधिकारी मृत्युमुखी पडले. दुर्घटना घडली तेव्हा निनाद मांडवगणे यांचे आई, वडील लखनऊ येथे निनाद यांच्या पत्नीच्या घरी होते. तेथे त्यांना दुपारी दोन वाजता हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडून या दु:खद घटनेची खबर देण्यात आली. नाशिक-पुणे रोडवरील डीजीपीनगर येथील बॅँक आॅफ इंडिया कॉलनीतील श्री साईस्वप्न को. आॅप. सोसायटीत मांडवगणे कुटुंब राहते. शहीद निनाद यांच्यावर नाशिक येथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतल्यामुळे बुधवारी रात्री हवाई दलाने शहीद निनाद यांच्या लखनऊ येथे आई, वडील, पत्नी व मुलगी अशा चौघांची नाशिक येथे पाठविण्यासाठी विमानाने सोय केली. त्यानुसार गुरुवारी सकाळी साडेसात वाजता मांडवगणे कुटुंबीय लखनऊ येथून इंडिगो विमानाने मुंबईत दाखल झाले. दुपारी खासगी वाहनाने तीन वाजेच्या सुमारास ते निवासस्थानी पोहोचले. दरम्यान शहीद निनाद यांच्यावर शुक्रवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने सायंकाळी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, आदी अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी कुटुंबीयांची भेट घेऊन चर्चा केली.रात्री उशिरा पार्थिवाचे आगमनशहीद निनाद यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी श्रीनगर येथून दिल्लीच्या पालम या हवाई दलाच्या विमानतळावर विशेष विमानाने सायंकाळी सव्वापाच वाजता आणण्यात आले. तेथे हवाई दलाचे सोपस्कार पूर्ण केल्यानंतर विशेष विमानाने रात्री ओझर विमानतळावर आणण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी तसेच हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. शुक्रवारी सकाळी शहीद निनाद यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने रात्रभर ओझर हवाई दलाच्या इलेक्ट्रिक फ्रीज रुग्णवाहिकेत पार्थिव ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता ओझरहून शहीद निनाद यांचे पार्थिव त्यांच्या बँक आॅफ इंडिया कॉलनीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी आणण्यात येणार आहे. त्यानंतर दोन तासांनी शासकीय इतमामात अंत्ययात्रा काढण्यात येईल. मांडवगणे यांचे निवासस्थान ते अमरधाम हे साधारणत: पाच किलोमीटरचे अंतर असल्याने पोलिसांनी या मार्गावरील वाहतुकीचे नियोजनही केले आहे.