नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने नाशिकहून राज्यभर ठिकठिकाणी प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या माथी जादा तिकीटदराच्या ‘शिवशाही’ बसेस मारल्या आहेत. ठरवून बजेटमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांना वेळेवर साधी बस (लाल रंगाची) मिळत नसल्याने नाइलाजास्तव ‘शिवशाही’ने प्रवास करावा लागत आहे. कमी दरात साध्या बसमधून प्रवास करण्याचा प्रवाशांचा हक्क महामंडळाने अप्रत्यक्षरीत्या हिरावून घेतला असून, महामंडळाच्या तोट्याची शिक्षा प्रवाशांना मिळत आहे. राज्यभरात प्रमुख शहरांमध्ये शिवशाही बसेस प्राप्त होताच महामंडळाने तोटा भरून काढण्यासाठी साध्या बसेसची संख्या कमी करून प्रवाशांसाठी मोठ्या प्रमाणात शिवशाहीच उपलब्ध करून दिल्या आहेत. विविध कामांसाठी जाण्याच्या हेतूने वेळेत प्रवास करून अपेक्षित ठिकाण गाठण्यासाठी बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांना प्रतीक्षा करूनही साधी बस मिळत नसल्याने आणि शिवशाहीच मोठ्या प्रमाणात बसस्थानकात लागलेल्या दिसत असल्याने नाइलाजास्तव त्यांचाच आधार घ्यावा लागत आहे. याशिवाय शिवशाही बस आरामदायी असल्याचे प्रारंभी सांगितले जात असले तरी, या बसेसच्या अनेक अडचणी आता समोर येऊ लागल्या आहेत. महामंडळाने जादा दराच्या शिवशाहींचा मारा सुरू केल्याने बजेटमध्ये प्रवास करू इच्छिणारे प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळले आहेत. खासगी बसेस, टॅक्सी आदी त्यांना सोयीस्कर ठरत आहेत. यामुळे एकप्रकारे अवैध वाहतुकीलाही प्रोत्साहन मिळत आहे. दुसरीकडे दुरुस्ती-देखभालीलाही परवडत नसण्याबरोबरच शिवशाही बºयाचदा अत्यंत कमी प्रवाशांसह धावत असून, त्यामुळे महामंडळाला बराच तोटाही सहन करावा लागत आहे. साध्या बसपेक्षा शिवशाहीचे तिकीट १०० ते १५० रुपयांनी जास्त आहे. आवडीप्रमाणे आणि बजेटप्रमाणे हव्या त्या बसमधून प्रवास करण्याचे स्वातंत्र्य मिळावे, अशी अपेक्षा प्रवासीवर्गाने केली आहे.नाशकातून ६४ शिवशाही, ७६ फे-यानाशिक शहरातून पुणे-मुंबईसह राज्याच्या निरनिराळ्या भागात सध्या ६७ शिवशाही गाड्या धावत असून, त्यांच्या दिवसभरात ७६ फेºया होत आहेत. राज्यभरात नाशिकहून ७०० साध्या बस धावत असल्याचे सांगितले जात असले तरी, यातल्या खूप कमी बसेस नाशिक आगाराच्या असून, बाहेरील आगारांच्या बसेस मोठ्या संख्येने नाशिकमार्गे प्रवासी घेऊन जातात व आणून सोडतात. नाशिक आगाराच्या ताफ्यात असणाºया शिवशाही बसपैकी ६१ बस या महामंडळाच्या स्वमालकीच्या तर सहा बस कॉन्ट्रॅक्टवर आहेत. नाशिक आगाराला शिवशाही बस मिळू लागल्या तशा आगाराने साध्या बस कमी कमी करत नेल्या आहेत.
‘शाही’चा आग्रह, ‘लाल’ला ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:37 AM