लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : येथील देवांग कोष्टी समाजातर्फे शाकंभरी पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.मधली गल्ली येथे चौंडेश्वरी मंदिरात शाकंभरी पौर्णिमा उत्सवा निमित्ताने वरोडे बंधु यांच्या संगीतमय साथीने महाआरती सह चौंडेश्वरी मातेची पंचामृता ने अभिषेक सोहळा विधीवत मनोज भागवत यांच्या हस्ते सपत्नीक मातेची पूजा करण्यात आली.पोर्णिमा निमित्ताने दिवसभरात सकाळी चांैडेश्वरी मातेचा पंचामृत अभिषेक सोहळा, भाज्यांची सजावट, रक्तदान शिबीर, विद्यार्थी गुणगौरव, कन्यारत्न मातांचा सत्कार व समुदायिक आरती महाप्रसाद असे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्र म या वेळी संपन्न झाले.सकाळी चौंडेश्वरी मातेला शाक-भाज्यांची सजावट करण्यात आली. तसेच व मातेला समाजातील महिलानी पूरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला.तसेच चौडेश्वरी सभागृहात जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सुमारे ७५ रक्तदात्यांनी यात सहभाग नोंदवला.सायंकाळी विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला.तसेच गणपती उत्सवादरम्यान श्रीमहालक्ष्मी आरास सजावट स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानीत करण्यात आले. माजी महिला अध्यक्ष हिराताई वाघुबरे यांच्या पुढाकारातून गतवर्षाप्रमाणे कन्यारत्न झालेल्या मातांचा साडी-चोळी देऊन सन्मान केला.दरम्यान अमोल असलकर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रभाकर आव्हाड, प्रा. नागडेकर, कैलास घटे, रोषन आदमने, महिला अध्यक्ष रेखा गलांडे, उपाध्यक्ष उर्मिला विधाते व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी महिला कार्यकारणी, युवक कार्यकारणी तसेच विश्वस्थ कार्यकारणी मंडळ आदींसह महिला, समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश भंडारी, योगेश ढूमणे यांनी तर प्रमोद आवणकर, ऋशाल खोजे यांनी आभार मानले.
येवल्यात शाकंभरी पौर्णिमा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 6:51 PM
येवला : येथील देवांग कोष्टी समाजातर्फे शाकंभरी पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
ठळक मुद्दे कन्यारत्न झालेल्या मातांचा साडी-चोळी देऊन सन्मान केला.