चांदवड : तालुक्यातील राजदेरवाडी येथे आज रविवारी पहाटे सहा वाजता महाश्रमदानात एक हजार लोकांनी श्रमदान केले. त्यात भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथ्था, चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल अहेर, चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, चांदवड पंचायत समितीचे सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, प्रांत अधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, गटविकास अधिकारी हिरामण मानकर, जैन संघटनेचे जिल्हा समन्वयक नंदकिशोर साखला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी राजदेरवाडी येथे ग्रामस्थांच्या सहकार्याने सलग समतल चर व लहान दगडी बांध यासाठी जागा निश्चित करून तेथे श्रमदान करण्यात आले. यावेळी राजदेरवाडीचे सर्व गावच नव्हे तर शालेय बालकेही या महाश्रमदानात सहभागी झाल्याने एक वेगळेच वातावरण दिसत होते, तर काल कृषी विभागाच्या कामाचे नियोजन तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र साळुंके, विजय पवार, उपसरपंच मनोज शिंदे, प्रशांत कदम, शिरीष पवार, भरत वानखेडे, विजय व्हलगडे, योगेश दमाले, सोमनाथ जाधव, ग्रामसेवक भागवत सोनवणे व ग्रामस्थांनी करून घेतल्याने मोठ्या प्रमाणात माती काढण्यात येऊन महाश्रमदान झाले.यावेळी उत्तर महाराष्टÑ समन्वयक दीपक चोपडा, चांदवड तालुका समन्वयक प्रमोद गोळेचा, सिन्नर तालुका समन्वयक मनोज भंडारी, भारतीय जैन संघटनेचे कार्यकर्ते, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र साळुंखे, कृषी अधिकारी विजय पवार, सहायक गटविकास अधिकारी सुुनील पाटील, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर सपकाळे, बांधकाम अभियंता निराळी, ल. पा. अभियंता एस. जी. कुमठेकर, कृषी मंडळ अधिकारी विजय पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज ठाकरे, शिक्षण अधिकारी बी. टी. चव्हाण, महिला व बालकल्याण अधिकारी गजानन शिंदे, कृषी अधिकारी संदीप मोगल, सचिन सरोदे, मोटेकर, नायब तहसीलदार रुपेश सुराणा, मीनाक्षी गोसावी, काळू बोरसे, भागवत सोनवणे तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी व तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.महाराष्टÑ दुष्काळग्रस्त अभियानमहाराष्टÑ दुष्काळग्रस्त अभियानांतर्गतच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी तीन हजारांहून अधिक गावांना जेसीबी, पोकलॅँड मशीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय भारतीय जैन संघटनेने घेतला आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र साळुंके यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली राजदेरवाडीचे उपसरपंच मनोज शिंदे यांनी गावाची एकी बघता येथे सलग समतल चर व लहान दगडी बांधाची निर्मिती अवघ्या तीन तासांत केल्याने शांतीलाल मुथ्था यांनी त्यांचे कौतुक केले.
वॉटर कपसाठी राजदेरवाडीत श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 11:33 PM
चांदवड : तालुक्यातील राजदेरवाडी येथे आज रविवारी पहाटे सहा वाजता महाश्रमदानात एक हजार लोकांनी श्रमदान केले. त्यात भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथ्था, चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल अहेर, चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, चांदवड पंचायत समितीचे सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, प्रांत अधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, गटविकास अधिकारी हिरामण ...
ठळक मुद्देसत्यमेव जयते : समतल चर, लहान दगडी बांध यासाठी खोदकाम सलग समतल चर व लहान दगडी बांधाची निर्मिती अवघ्या तीन तासांत