ओझर : सुर्यपूत्र शनैश्वर महाराज जयंती निमित्त सोमवारी विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.विकारी नाम संवत्सर उत्तरायण वसंत ऋतूचा दुर्मिळ योग असल्याने सकाळपासून मारूती वेस येथील शनी मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती.सकाळी साडेसात वाजता महायागाला सुरूवात झाली.सकाळी अकरा वाजता यज्ञ होऊन जन्मोत्सव साजरा करण्यात आला.त्यानंतर महाआरती संपन्न झाली.दुपारी गावातील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.पौरोहित्य सतीश क्षीरसागर व नाशिक येथील ब्राह्मणवृंदानी केले.महापूजेला गावातील अनेक यजमान सहभागी झाले होते. सोमवार आणि त्यात शनी महाराज जयंती आल्याने पहाटे पासून वातावरण भक्तीमय झाले होते. उत्सव समितीच्या वतीने सुनील कोठावदे, विजय गवळी, अॅडव्होकेट शामराव पगार, प्रवीण वाघ, विनोद चांडक, प्रकाश महाले, प्रभाकर महाले, कैलास काळे, दादा चांडक, विकी पांडे, गोविंद गावंडे, पोपटराव निंबाळकर, बलराम जस्सल, प्रल्हाद चौधरी, पांडुरंग अहेर, प्रकाश कडाळे, विनोद विधाते, संतोष शेलार आदींनी नियोजन केले.
ओझर येथे शैनेश्वर महाराज जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 12:36 PM