नाशिक : शंकराचार्य न्यास, सांस्कृतिक विभागातर्फे व मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.२३) सायंकाळी ६.३० वाजता शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात गायन मैफल आयोजित करण्यात आली आहे.या मैफलीत ग्वाल्हेर गानशैलीतील गानतपस्वी पं. शरद साठे गायना सादर करतील. पं. शरद साठे यांनी सांगीतिक तालीम प्रख्यात गायक पं. द. वि. पलुस्कर यांच्याकडे घेतली. त्यानंतर त्यांना प्रदीर्घकाळ ख्यातनाम गुरू प्रो. बा. र. देवधर, ग्वाल्हेर घराण्याचे पं. शरदचंद्र आरोळक यांचे मार्गदर्शन लाभले. आर्ज ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक म्हणून पं. शरद साठे ओळखले जातात. आजवरच्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झाले. नाशिक येथील मैफलीत साठे यांना श्रृतिंद्र कातगडे तबला साथ करतील तर चैतन्य कुंटे संवादिनीवर साथ करतील.
शंकराचार्य न्यासतर्फे शरद साठे यांचे गायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:54 AM