नाशिक : महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधूंविषयी केलेल्या कथित वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी वडेट्टीवर व ठाकरे सरकारविरोधात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील सर्व साधुंसह विविध हिंदूत्वादी संघटना सोमवारी (दि.१५) रामकुंडावर शंखनाद आंदोलन करणार असल्याची माहिती भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्य आचार्य तुषार भोसले यांनी दिला आहे.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून साधूंवर विश्वास ठेऊ नका, साधू नालायक असतात, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आचार्य तुषार भोसले रविवारी ( दि,१४) भाजपच्या वसंतस्मृती कार्यालय कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना केला. वडेट्टीवार यांनी काही साधूंची नावे घेतली असली तरी ते साधू नसून भोंदू आहेत. मात्र अशाप्रकारे सर्वस्वाचे त्याग करणाऱ्या साधूंचा अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचे नमूद करतानाच काँग्रेसच्या जे पोटात आहे, तेच त्यांच्या ओठावर आल्याची टीकाही भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी केली आहे. साधूंची माफी मागावी अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याचा इशाराही तुषार भोसले यांनी दिला आहे.
इन्फो-
असा महाराष्ट्र अपेक्षित आहे का
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही त्यांनी टीकेचे लक्ष केले. हिंदू समाजाचा अपमान तुमचे मंत्री करणार असतील तर हीच तुमची, तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या आहे का? असा साधुसंतांचा महाराष्ट्र तुम्हाला अपेक्षित आहे का? असा सवाल उपस्थित करतानाच राज्यात सगळा स्वैराचार सुरू आहे. मंत्रीमंडळातील मंत्रीच महिलांवर अत्याचार करीत असल्याचा आरोपही तुषार भोसले यांनी केला आहे.
===Photopath===
140221\14nsk_10_14022021_13.jpg
===Caption===
पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्य आचार्य तुषार भोसले