नाशिक : जीवनात क्षेत्र कोणतेही निवडा, मात्र त्यात परिपूर्ण असणे गरजेचे आहे. शिक्षण कितीही घेतले तरी स्वत:चा सर्वांगीण विकास साधतानाच चांगला नागरिक, चांगली व्यक्ती म्हणून आपली ओळख निर्माण केल्यास जीवनात यश मिळविता येईल. प्रेरणेपासून ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी स्वत:लाच सिद्ध करावे लागते, असे प्रतिपादन ठाणे येथील राष्ट्रपती पुरस्कार विजेते अतिरिक्त पोलीस आयुक्त शांताराम अवसरे यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रोटरी क्लब आॅफ नाशिकतर्फे मुलांच्या सुप्तगुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्यातील नेतृत्व गुणांनाही प्रोत्साहित करण्यासाठी युवक-युवतींसाठी आयोजित ‘रायला २०१८’ या तीनदिवसीय शिबिराचा समारोप रविवारी (दि.४) झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अवसरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रोटरीचे अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल, रायलाचे चेअरमन पंडित खांदवे, डॉ. श्रिया कुलकर्णी, राधेय येवले यावेळी उपस्थित होते. रोटरीचे अध्यक्ष दिलीपसिंह बेनिवाल यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. या शिबिरात डॉ. अनिता नेहेते यांनी आपत्कालीन परिस्थितीबाबत मार्गदर्शन केले. धावपटू कविता राऊत हिने मुुलांना धावण्याच्या टीप्स दिल्या.कवितानेही यावेळी मुलांशी मनमोकळा संवाद साधला. तसेच डॉ. दिनेश मदनूरकर, विजय दिनांनी, मुग्धा लेले, आनंद कोठारी, डॉ. अतुल कनिकर, सचिन ब्राह्मणकर, विकास साळुंके यांनीही विविध विषयांवर मार्गदर्शन केले. प्रारंभी रायलाचे चेअरमन पंडित खांदवे यांनी प्रास्ताविक केले. शेखर ढिकले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन सुरेखा राजपूत यांनी केले. कार्यक्रमास मुक्त विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, तसेच विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.कविताने साधला संवादधावपटू कविता राऊत हिने मुुलांना धावण्याच्या टीप्स दिल्या. याशिवाय क्र ीडा क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी कशा पद्धतीने कामगिरी करायला हवी, याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. श्रिया कुलकर्णी यांनी घेतलेल्या राऊत हिच्या मुलाखतीतून मुलांना तिचा आॅलिम्पिक स्पर्धेपर्यंतचा खडतर प्रवास कसा झाला याची जाणीव झाली.
कोणत्याही क्षेत्रात सिद्धता महत्त्वाची शांताराम अवसरे : ‘रायला’ शिबिराचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 1:02 AM
नाशिक : जीवनात क्षेत्र कोणतेही निवडा, मात्र त्यात परिपूर्ण असणे गरजेचे आहे. चांगला नागरिक, चांगली व्यक्ती म्हणून आपली ओळख निर्माण केल्यास जीवनात यश मिळविता येईल.
ठळक मुद्देमुलांच्या सुप्तगुणांना वाव आपत्कालीन परिस्थितीबाबत मार्गदर्शन