ओझर टाउनशिप : जागतिक योग दिनानिमित्त निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज धर्मपीठाचे पिठाधीश्वर शांतिगिरी महाराज यांनी योगासने घालत भाविकांना योगाचे महत्त्व पटवून दिले. रविवारी (दि. २१) ब्रह्ममुहूर्तावर नित्यनियम विधी, महाआरती, भागवत वाचन संपन्न झाले. योगासन वर्गानंतर श्रमदान पार पडले.जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. श्री क्षेत्र वेरुळ येथे गुरु कुलातील विद्यार्थी, आश्रमीय ब्रह्मचारी संत आणि काही मोजक्या साधकांच्या उपस्थितीत शांतिगिरी महाराजांनी पुराणातील योगाच्या परंपरेची माहिती दिली.योगाचे विविधांगी फायदे भाविकांना समजावून सांगितले. शरीर, मन, आरोग्य अबाधित राहण्यासाठी योगासने महत्त्वाचे आहे. भारतीय संस्कृती व परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून योगाकडे पाहिले जाते, असे ते म्हणाले. महाराजांनी चक्र ासन, धनुरासन, शिरसासन, हलासन, भुजंगासन, गर्भासन, कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी, ध्यान आदी विविध योगासनांचे प्रात्यक्षिके करून दाखवली.मानवजातीच्या कल्याणासाठी ऋषिमुनींनी प्राणायमांचा आविष्कार केला. प्राणायामच्या माध्यमातून ताण-तणावाचे व्यवस्थापन करता येते. ध्यानधारणेतून मनुष्य जीवनाचे रहस्य, उद्देश जाणून घेता येतो, अशी शिकवण यावेळी त्यांनी दिली. महाराजांनी फेसबुकद्वारे देशभरातील आपल्या भविकांसह संवाद साधत मार्गदर्शन केले.(फोटो २२ शांतिगिरी, १)
शांतिगिरी महाराजांनी भक्तांना दिले योगाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 4:33 PM
ओझर टाउनशिप : जागतिक योग दिनानिमित्त निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज धर्मपीठाचे पिठाधीश्वर शांतिगिरी महाराज यांनी योगासने घालत भाविकांना योगाचे महत्त्व पटवून दिले. रविवारी (दि. २१) ब्रह्ममुहूर्तावर नित्यनियम विधी, महाआरती, भागवत वाचन संपन्न झाले. योगासन वर्गानंतर श्रमदान पार पडले.
ठळक मुद्देमहाराजांनी पुराणातील योगाच्या परंपरेची माहिती दिली.