नाशिक- सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी व प्रामुख्याने पंचवटीतील सरदार चौकात गुढ्यांच्या साड्या तयार करण्याचे काम वेगाने सुरु असलेले पहायला मिळत आहे. आकर्षक, चमकदार काठापदराचे कापड निवडून त्यापासून ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार साड्या शिवुन दिल्या जात आहे. कपड्याचा प्रकार व साईजनुसार याचे दर ३० ते १०० रुपये असून जर, लेस, कपडा, मोती यांचा वापर करीत महिलांकडून या साड्या भरपुर निºया घेत तयार होत आहेत. आधुनिक जीवनशैलींच्या घरात गुढी बांधण्यास जागा आणि वेळ नसल्याने आणि अत्याधुनिक घरे, आॅफिस, क्लिनीक याठिकाणी सहजतेने ठेवता येतील अशा टेबल गुढ्याही तयार केल्या जात आहे. या गुढ्यांवर काठी, साडी, कृत्रिम फुलांची, हारकड्याची माळ, कृत्रिम निंबोळीचा पाल, कुंदन, मणी, टिकल्या, घुंगरु यांचा वापर केला जात असल्याने या गुढ्या आकर्षक दिसत आहेत. १०० ते ५०० रुपये असे त्यांचे दर असून त्यांनाही मोठी मागणी पहायला मिळत आहे. दिवसभरात मोठ्या प्रमाणात गुढीच्या रेडिमेड साड्या व टेबल गुढया तयार होत असून यंदाही या दोन्ही प्रकारांना मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता कारागिरांनी व्यक्त केली आहे.
नाशकात गुढीच्या साड्या घेताय आकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 11:53 IST
आकर्षक, चमकदार काठापदराचे कापड निवडून त्यापासून ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार साड्या शिवुन दिल्या जात आहे
नाशकात गुढीच्या साड्या घेताय आकार
ठळक मुद्देटेबल गुढ्यांचीही निर्मीतीआकार, प्रकारांनुसार ठरतात दर