शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरून शरद पवार vs अजित पवार समर्थक आमनेसामने

By श्याम बागुल | Published: July 04, 2023 4:36 PM

शरद पवार आणि अजित पवार यांचे समर्थक आमने-सामने

श्याम बागुल, नाशिक : राष्ट्रवादीच्या बंडानंतर नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय ताब्यात घेण्यावरून शरद पवार गट विरूद्ध अजित पवार, छगन भुजबळ गट एकमेकांच्या समोर उभे ठाकल्याने मोठा राजकीय तणाव निर्माण झाला. दोन्ही गटांकडून एकमेकांच्या झिंदाबाद, मुर्दाबादच्या घोेषणा देत कार्यालयावर चालून जाण्यासाठी रेटारेटी होऊन पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

अजित पवार, छगन भुजबळ हे सत्तेत गेल्यामुळे नाशिकचे कार्यकर्ते कोणासोबत असा प्रश्न उपस्थित केला जात असतांनाच सोमवारी (दि.३) शरद पवार समर्थक निष्ठावंतांची गोपनिय बैठक होवून शरद पवार यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच मंगळवारी (दि.४) पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठकही बोलविली होती. परंतु तत्पुर्वीच सकाळपासून राष्ट्रवादी व समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनचा ताबा घेत तळमजल्यावर बसून होते. दुसरीकडे शरद पवार निष्ठावंत गटाच्या पदाधिकारी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यलयासमोर जमले  होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास शरद पवार यांच्या समर्थकांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन्ही बाजुंकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी बाका प्रसंग ओळखून दोन्ही गटांना दूर सारण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांच्या गटाला कार्यालयात प्रवेश देण्यात पोलिसांनी हरकत घेतल्याने अखेर कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNashikनाशिक