नांदूरवैद्य : इगतपुरी जवळील नांदगाव सदो येथे पाच ते सहा दिवसांपूर्वी राजेंद्र तांदळे या शेतकºयाच्या शेतातील घरात एका बिबट्या मादीने चार बछड्यांना आणल्याची घटना १५ आॅगस्टच्या रात्री घडली होती. त्याच पार्श्वभूमीवर या घरात बिबट्या मादीचा शोध घेण्यासाठी वनविभागाने सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. बुधवारी (दि.१९) अचानक सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही बिबट्या मादी आपल्या चारही बछड्यांना दूध पाजतांना कॅमेºयामध्ये कैद झाल्याचे दिसून आले.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आता ही बिबट्या मादी बछड्यांना तिथेच ठेवणार की दूसरीकडे घेऊन जाणार असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा टाकला आहे.इगतपुरीत गेल्या पंधरा दिवसांपासुन जोरदार मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे आता जंगलातील वन्य प्राणीही मानवाच्या घरी आश्रयाला येत असल्याच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना इगतपुरी तालुक्यातील नांदगावसदो येथील शांकबरी देवी मंदिर परीसरातील शेतकरी राजेंद्र तांदळे यांनी शेतात बांधलेल्या पडक्या घरात घडली आहे. राजेंद्र तांदळे सध्या गावात राहात असुन शेतातील घर मोकळेच असल्याने जंगलातील मादी बिबट्याने दि. १५ रोजी रात्रीच्या सुमारास पंधरा दिवसाच्या ४ बछड्यांना या मोकळ्या घरात आणुन बिबट्यानं आश्रय घेतल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.वनविभागाकडून बिबट्या आणि बछड्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असुन मादी बिबट्या आणि ४ बछड्यांची दृश्य वनविभागाच्या कॅमेरात कैद झाली आहेत.या घटनेकडे वनविभाग नजर ठेवून असून सध्या या परीसरात अतिवृष्टी होत असल्याने तुर्त या घराच्या परीसरात वनरक्षकांचे पथक तैनात केलेले आहे. सीसीटीव्हीचे कंट्रोल नाशिक येथील उपवनविभागाच्या कार्यालयात असुन पाऊस कमी झाल्यावर ही बिबट्याची मादी या बछड्यांना पुन्हा जंगलात घेऊन जाईल. सध्या या परीसरात नागरीकांना येण्यास बंदी घातल्याची माहीती वनविभागाचे वनपाल पोपटराव डांगे यांनी दिली.
‘ती’ बिबट्याची मादी बछड्यांना दूध पाजतांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 7:11 PM
नांदूरवैद्य : इगतपुरी जवळील नांदगाव सदो येथे पाच ते सहा दिवसांपूर्वी राजेंद्र तांदळे या शेतकºयाच्या शेतातील घरात एका बिबट्या मादीने चार बछड्यांना आणल्याची घटना १५ आॅगस्टच्या रात्री घडली होती. त्याच पार्श्वभूमीवर या घरात बिबट्या मादीचा शोध घेण्यासाठी वनविभागाने सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. बुधवारी (दि.१९) अचानक सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही बिबट्या मादी आपल्या चारही बछड्यांना दूध पाजतांना कॅमेºयामध्ये कैद झाल्याचे दिसून आले.
ठळक मुद्देनांदगाव सदो येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण