शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

गर्भवतीच्या मदतीला  ‘ती’ धावली देवदूतासारखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 1:18 AM

पांढुर्लीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत असतानाच वाटेतच महिलेला असह्य कळा सुरू झाल्या आणि रुग्णवाहिकेतील महिला डॉक्टर व परिचारिकेला सदर महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती करावी लागली.

लोकमत शुभवर्तमान

नाशिक : पांढुर्लीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत असतानाच वाटेतच महिलेला असह्य कळा सुरू झाल्या आणि रुग्णवाहिकेतील महिला डॉक्टर व परिचारिकेला सदर महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती करावी लागली. महिलेने जुळ्या बाळांना जन्म दिला असून, माता व बालकांची प्रकृती स्थिर आहे. गर्भवती महिलेच्या मदतीला रुग्णवाहिका एकप्रकारे देवदूतासारखीच धावून आली.  बुधवारी (दि.१९) सिन्नर-घोटी राज्य महामार्गावरील पांढुर्ली येथे मुक्ता तुकाराम म्हसाळ (३५) या नियमित तपासणीसाठी आल्या होत्या. यावेळी त्यांना त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांनी तपासणी करून रुग्णवाहिकेत एका परिचारिकेसह त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. यावेळी रुग्णवाहिकेवर नियुक्त डॉक्टर कांचन चव्हाण यांनी त्वरित सदर महिलेची रक्तदाबासह अन्य बाबी तपासल्या. रुग्णवाहिका चालक भीमराव जाधव यांनी भगूरमार्गे जिल्हा रुग्णालयाच्या दिशेने रुग्णवाहिका मार्गस्थ केली. दरम्यान, विंचूरदळवी जवळ म्हसाळ यांना कळा सुरू झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने चव्हाण यांनी रुग्णवाहिका सुरक्षित ठिकाणी थांबविली. यावेळी परिचारिका व डॉक्टरांनी महिलेची यशस्वीरीत्या प्रसूती केली. सकाळी पावणेअकरा वाजता महिलेने मुलाला जन्म दिला.देवळाली जवळ येताच मातेला पुन्हा त्रास सुरू झाल्याने रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला थांबविण्यात आली. दुसऱ्यांदा प्रसूतीची तयारी क रत वीस मिनिटाच्या अंतराने दुसरी प्रसूती झाली. महिलेने एका गोंडस चिमुकलीला जन्म दिला. रुग्णवाहिकेतच म्हसाळ यांना पुत्र व कन्यारत्न प्राप्त झाले.रुग्णवाहिकेत प्रसूत झालेली माता व तिचे दोन्ही बाळ सुदृढ असून, मुलाचे वजन १६७५ ग्रॅम तर मुलीचे वजन १५८० ग्रॅम इतके आहे. माता-बालक ांची प्रकृती स्थिर असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ग्रामीण भागात प्रसूतीच्या अंतिम टप्प्यात गर्भवती महिला प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात किंवा १०८ रुग्णवाहिकेची मदत घेतात. त्यामुळे अनेकदा रुग्णवाहिकेतच महिलांची प्रसूती होते.

टॅग्स :WomenमहिलाNashikनाशिकhospitalहॉस्पिटल