ममदापूर : परिसरात पाणीप्रश्न गंभीर बनला असून, अद्याप शासकीय टँकर सुरू झालेला नाही. यावर उपाय म्हणून गावातील मेंढपाळ प्रकाश वनसे हे स्वखर्चाने गावात पाणीवाटप करत आहेत. मुख्य म्हणजे वनसे यांनी स्वत:च्या मेंढ्या विक्री करून पाण्यासाठी टँकर खरेदी केला आहे. कचरू वनसे हे माजी सरपंच असून, प्रकाश वनसे त्याच्या पावलावर पाऊल ठेवून समाजसेवा करत आहेत. वनसे याचे सहा भावाचे कुटुंब असून, त्यांच्याकडे सातशेच्या वर जवळपास मेंढ्या आहेत.येवला तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून, मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी कळपातील २५ मेंढ्या प्रत्येकी तीन हजार रुपयांनी विकून सत्तर हजार रुपये किमतीचा पाण्याचा टँकर खरेदी केला. मिळेल त्या विहिरीतून पाणी मिळेल तसे घेऊन मेंढ्याच्या बिऱ्हाडाबरोबर घेऊन फिरण्याची पाळी मेंढपाळांवर आली आहे. सद्यस्थितीत बाहेर गावी मेंढ्यांना पाणी आहे त्यामुळे ममदापूर येथील मेंढ्यांबरोबर टँकर ठेवून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. (वार्ताहर)
मेंढपाळ मेंढ्यांसह गावात करतो मोफत पाणीवाटप
By admin | Published: February 27, 2016 10:05 PM