सातपूर प्रभाग सभापतीपदाची निवडणूक जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या निवडणुकीत शिवसेनेच्यावतीने मधुकर जाधव, तर भाजप - मनसे युतीचे योगेश शेवरे निवडणूक रिंगणात होते. मागील निवडणुकीत मनसेने भाजपाला समर्थन दिले होते. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाने मनसेला समर्थन दिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. सातपूर विभागात २०पैकी भाजपाला ९ आणि मनसे २ असे बहुमत, तर शिवसेना ८ आणि रिपाइं १ असे पक्षीय बलाबल आहे. अपेक्षित बहुमत नसल्याने सेनेचे उमेदवार मधुकर जाधव यांनी माघार घेतली. या निवडणुकीत दिनकर पाटील, रवींद्र धिवरे, हेमलता कांडेकर, डॉ. वर्षा भालेराव, शशिकांत जाधव, इंदुबाई नागरे, पल्लवी पाटील, अलका अहिरे, माधुरी बोलकर, सलीम शेख, योगेश शेवरे, विलास शिंदे, संतोष गायकवाड, मधुकर जाधव, भागवत आरोटे, दीक्षा लोंढे आदींनी सहभाग घेतला. शेवरे यांची बिनविरोध निवड झाल्याने मनसे कार्यकर्ते आणि समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.
फोटो : सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे यांची बिनविरोध निवड झाल्याने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी स्थायी सभापती गणेश गीते, सलीम शेख, दिनकर पाटील, रवींद्र धिवरे आदी.
190721\19nsk_45_19072021_13.jpg
सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतांना स्थायी सभापती गणेश गीते.समवेत सलीम शेख,दिनकर पाटील,रवींद्र धिवरे आदी.