शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

लोकसभा निकालाची उत्कंठा शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 1:12 AM

गेल्या तीन महिन्यांपासून उत्सुकता ताणल्या गेलेल्या जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी करण्यात येणार असून, निकालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

नाशिक : गेल्या तीन महिन्यांपासून उत्सुकता ताणल्या गेलेल्या जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी करण्यात येणार असून, निकालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. अलीकडेच जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या दावे-प्रतिदाव्यांमुळे उमेदवार व समर्थकांची धाकधूक वाढली आहे.जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत २९ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले होते. त्यात नाशिक मतदारसंघात ५९.४३ व दिंडोरीत ६५.६४ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. तत्पूर्वी या निवडणुकीच्या निमित्ताने जानेवारी महिन्यापासूनच राजकीय वातावरण तप्त झाले होते. निवडणूक लढविणाºया राजकीय पक्षांनी मेळावे, बैठका घेऊन मतदारांचा कल जाणून घेण्याबरोबरच उमेदवारांचीही चाचपणी केली होती. नाशिक लोकसभा मतदारसंघाने नेहमीच परिवर्तन केले असल्यामुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीबाबत संशय घेतला जात होता, त्याचबरोबर पक्षातील अन्य इच्छुकांनी उमेदवारीसाठी दावेदारी केल्यामुळे चुरस निर्माण झाली होती. अखेर गोडसे यांनी बाजी मारून उमेदवारी आणली, तर राष्टÑवादीकडून भुजबळ कुटुंबीयातील कोणीतरी उमेदवारी करणार असल्याचे निश्चित मानले जात असताना मोठे भुजबळ की छोटे याबाबत उत्सुकता ताणली जात असताना माजी खासदार समीर भुजबळ यांना पक्षाने उमेदवारी दिली. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे बहुजन वंचित आघाडीने यंदा पहिल्यांदाच उमेदवार रिंगणात उतरविला. माजी नगरसेवक पवन पवार यांना उमेदवारी दिली, तर सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी सेना व भाजपाकडे उमेदवारी मागितली, परंतु पदरी निराशा पडल्याने त्यांनी थेट बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी केली. या प्रमुख चार उमेदवारांसह निवडणुकीच्या रिंगणात १८ उमेदवार उतरल्याने मतदानासाठी दोन यंत्रे वापरण्यात आली.दिंडोरी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीपूर्वी मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या. तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण यांना पक्षाने उमेदवारी नाकारली तर त्यांच्या जागी राष्टÑवादीतून आलेल्या डॉ. भारती पवार यांना ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. राष्टÑवादी कॉँग्रेसनेदेखील दिंडोरीचे शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिल्याने दोन्ही प्रमुख पक्षांनी आयात उमेदवारांना उमेदवारी दिली.दावे-प्रतिदावेआदिवासींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातील पेठ, सुरगाणा, कळवणवर पकड ठेवून असलेले माकपाचे विद्यमान आमदार जिवा पांडू गावित यांनीही निवडणुकीत उडी घेऊन चुरस वाढवली.याशिवाय बहुजन वंचित आघाडी, बसपा यांच्यासह पाच उमेदवार रिंगणात आहेत. दिंडोरीत गेल्या वेळेपेक्षा यंदा मतदानाचा टक्का वाढल्याने त्याचा कोणाला लाभ होतो किंवा फटका बसतो ते गुरुवारी कळणार आहे.दोन्ही मतदारसंघांतील सर्वच उमेदवारांनी विजयाचे दावे केले असले तरी, उमेदवार व त्यांच्या समर्थकांची धडधड वाढली आहे.रविवारी वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल जाहीर केल्यानंतर त्यावर होणारे दावे, प्रतिदावे पाहता, मतदानयंत्रातून काय चमत्कार होतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.निकालाची उत्सुकता शहरी भागासह ग्रामीण भागात देखील पराकोटीला पोहचली असून एक्झिट पोल नंतर दावे-प्रतिदावे अधिकच तीव्र झाले आहे़प्रशासनाची तयारी पूर्णगुरुवारी सकाळी आठ वाजता अंबडच्या सेंट्रल वेअर हाउस येथे मतमोजणी करण्यात येणार असून, प्रशासनाने त्याची तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणीसाठी दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी ८६ टेबल लावण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे दोन हजार कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी कर्मचारी, अधिकाºयांच्या प्रशिक्षणाचा एक टप्पा पूर्ण झाला आहे. मंगळवारी प्रशासनाने मतमोजणीची रंगीत तालीम पूर्ण केली. निवडणुकीच्या निकालाचा विचार करता शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, तर मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९nashik-pcनाशिक