त्र्यंबकेश्वर : सप्तशृंगी देवीच्या दर्शनानंतर प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा यांनी आप्तस्वकीयांसह बुधवारी (दि. ५) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. भगवान भोलेनाथाच्या दरबारात येऊन प्रसन्नता लाभल्याची भावना शिल्पा शेट्टी हिने व्यक्त केली. दरम्यान, शिल्पाला बघण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती तर तिच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी चढाओढ लागली होती.मंगळवारी (दि. ४) सप्तशृंगी देवीच्या चरणी लीन झाल्यानंतर शिल्पा शेट्टी हिने कुटुंबियांसह सायंकाळी भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचे येथे आगमन झाले. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रशांत गायधनी, संतोष कदम यांनी त्यांचे स्वागत केले. भगवान त्र्यंबकराजाच्या मंदिरात जाऊन त्यांनी भोलेनाथाचे दर्शन घेतले. दर्शन झाल्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात त्यांचा सत्कार समारंभ पार पडला. तत्पूर्वी विश्वस्त प्रशांत गायधनी व संतोष कदम यांनी त्यांना मंदिराचे महात्म्य सांगितले. तर पुरोहित वेदमूर्ती रतीश तथा बापू दशपुत्रे यांनी भगवान त्र्यंबकेश्वराच्या त्रिकाळ पूजेची माहिती दिली. भगवान भोलेनाथाच्या दरबारात येऊन प्रसन्नता लाभल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांच्यासमवेत फोटो काढण्यासाठी नागरिकांमध्ये चढाओढ लागली होती. यावेळी देवस्थानचे अधिकारी अमित टोकेकर, विजय गंगापुत्र, उदय पाटील आदींसह कर्मचारी उपस्थित होते. कार्यालयातून बाहेर पडताच त्यांना बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.फोटो- ०५ शिल्पा शेट्टी१/२त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांचा सत्कार देवस्थानचे विश्वस्त संतोष कदम व प्रशांत गायधनी यांनी केला.
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा त्र्यंबकराजाच्या चरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2022 10:26 PM
त्र्यंबकेश्वर : सप्तशृंगी देवीच्या दर्शनानंतर प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा यांनी आप्तस्वकीयांसह बुधवारी (दि. ५) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. भगवान भोलेनाथाच्या दरबारात येऊन प्रसन्नता लाभल्याची भावना शिल्पा शेट्टी हिने व्यक्त केली. दरम्यान, शिल्पाला बघण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती तर तिच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी चढाओढ लागली होती.
ठळक मुद्देदर्शन झाल्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात त्यांचा सत्कार समारंभ पार पडला.