नाशिक : शहरातील जुने नाशिक येथील संत नामदेव विठ्ठल मंदिरासह उपनगरातील विविध मंदिरांमध्ये समस्त शिंपी समाज संस्थेतर्फे संत नामदेव महाराज यांचा जयंती सोहळा उत्साहत साजरा करण्यात आला. विविध मंदिरांमध्ये प्रदेशाध्यक्ष अरुण नेवासकर यांच्या हस्ते संत नामदेव महाराज प्रतिमेपूजन करून संत नामदेव महाराज यांना वंदन करण्यात आले. मेनरोड येथील संत गाडगे महाराज पुतळा येथे सकाळी माजी महापौर विनायक पांडे व अरुण नेवासकर यांच्या हस्ते संत नामदेव महाराज प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शहरातील जुने नाशिक, पंचवटीसह, विविध ठिकाणच्या संत नामदेव विठ्ठल मंदिरात पूजन व महाआरती करण्यात आली. यावेळी शिंपी समाज संस्था प्रदेशाध्यक्ष अरुण नेवासकर यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी संत नामदेव शिंपी समाज उन्नती संस्था, नामदेव भक्त परिषद, नामदेव ब्रिगेड, नामदेव प्रतिष्ठान व समस्त शिंपी समाज संस्थाप्रणीत संत नाम लीला ग्रुप नाशिक सहपरिक्षेत्रातील विविध मंडळाच्या समाजबांधव पदाधिकाऱ्यांसह नंदन रहाणे, प्रशांत निरगुडे, ज्ञानेश्वर औसरकर, प्रदीप जगताप, सतीश भांबारे, सोमनाथ गायकवाड, प्रवीण पवार, रमेश चांदोले, त्र्यंबक काळे, नंदू गंगावणे, रमेश बकरे, सुधाकर वारे, योगेश वारे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.दिवसभर सांप्रदायिक कार्यक्रमाची मेजवानी जुने नाशिक येथील संत नामदेव विठ्ठल मंदिरात सालाबादप्रमाणे संत नामदेव यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त दिवसभर विविध सांप्रदायिक कार्यक्रम झाले. सकाळी ६ ते ८ काकडारती भजन व त्यानंतर ८ ते १० या कालावधित महिला मंडळाचे दैनिक हरिपाठ व भजन झाले. रात्री ८ ते ९ सुप्रसिद्ध बासरीवादक मोहनजी उपासनी यांचे बासरीवादन व गायन रंगले. त्यानंतर महाआरती व महाप्रसाद झाल्यानंतर श्री संत नामदेव भजनी मंडळ व म्हसरूळ भजनी मंडळाचा हरिजागर झाला.संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा जयंती उत्सव तथा कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर रामकुं डावर दीपोत्सवाने साजरा करण्यात आला. त्यामुळे रामकुंड परिसर उजळून निघाला होता. रामकुं डावर सालाबादप्रमाणे संत नामदेव महाराजांची प्रतिकृती दीपोत्सवाने सजवून त्यांच्या अभंगांचे सामूहिक गायन यावेळी भक्त परिवाराकडून करण्यात आले. यावेळी नाशिकमधील संत नामदेव शिंपी समाज उन्नती संस्था, नामदेव भक्त परिषद, नामदेव ब्रिगेड, नामदेव प्रतिष्ठान व समस्त शिंपी समाज संस्थाप्रणीत संत नाम लीला ग्रुपसह नाशिक सहपरिक्षेत्रातील विविध मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जयंती महोत्सवात सहभाग घेतला.
शिंपी समाजातर्फे संत नामदेव विठ्ठल मंदिरात प्रतिमापूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 1:09 AM