शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

शिंदे टोलनाक्यावर बसप्रवासात सहप्रवाशाने चोरला मोबाइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:32 AM

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसमधून पुणे-नाशिक प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा महागडा मोबाइल सहप्रवाशाने चोरून नेल्याची घटना शिंदे टोल नाका परिसरात घडली़ या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी संशयित जगदीश लामाणी (२१, रा. राजाराम गल्ली, गोरेगाव वेस्ट, मुंबई) विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़

नाशिक : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसमधून पुणे-नाशिक प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा महागडा मोबाइल सहप्रवाशाने चोरून नेल्याची घटना शिंदे टोल नाका परिसरात घडली़ या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी संशयित जगदीश लामाणी (२१, रा. राजाराम गल्ली, गोरेगाव वेस्ट, मुंबई) विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़ नाशिकरोड पोलीस ठाण्यात इशान भालेराव (२७, रा. वाघुली, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री एक वाजेच्या सुमारास ते शिवशाही बसने (एमएच ०९, ईएम १९३१)पुण्याहून नाशिकला येत होते़ यावेळी सहप्रवासी असलेल्या संशयित लामाणी याने संगमनेर ते शिंदे टोल नाकादरम्यान भालेराव यांचा २५ हजार रुपये किमतीचा महागडा मोबाइल चोरला़ या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी संशयित लामाणी यास अटक केली आहे़  मोबाइल चोरीची दुसरी घटना पंचवटीतील धनदाई लॉन्सजवळ घडली़ गोविंदनगर येथील सद्गुरू अपार्टमेंटमधील रहिवासी संजय खैरनार हे बुधवारी (दि़२७ जून) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास धनदाई लॉन्समध्ये गेले होते़ या ठिकाणी चोरट्यांनी त्यांचा ४४ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला़ या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़तीन दुचाकींची चोरीशहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून, चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्या आहेत़ मखमलाबाद येथील विद्यानगर येथील रहिवासी रोहित आवारे यांची २० हजार रुपये किमतीची हिरोहोंडा स्प्लेंडर दुचाकी (एमएच १५, बीएल ७३५६) रावसाहेब थोरात सभागृहाच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पंचवटीतील विमलनाथ प्राइडमधील रहिवासी रुचिका कुचेरिया यांची २५ हजार रुपये किमतीची अ‍ॅक्टिवा दुचाकी (एमएच १५, ईडब्ल्यू २०७०) चोरट्यांनी बीवायके कॉलेजच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ बळीमंदिर चौकातील चक्रधरनगर येथील रहिवासी महेश ठाकरे यांची डिलक्स दुचाकी (एमएच ४१, एएच ७०२९) चोरट्यांनी श्याम सिल्व्हर अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ट्रकच्या बॅटºयांची चोरीघराजवळ उभ्या केलेल्या ट्रकच्या दोन बॅटºया चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नाशिक-पुणे रोडवरील शिंदे गावात घडली़ शिंदे येथील पोपट गायधनी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी आपला ट्रक (एमएच १५ एजी ३५७७) घराजवळ उभा केलेला होता़ चोरट्यांनी या ट्रकच्या कॅबिनमधील व ट्रकला लावलेल्या अशा दोन बॅटºया चोरून नेल्या़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Policeपोलिसnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय