गुन्हा दाखल : संशयिताला घेतले ताब्यातचांदवड : मुलास का रागावले व मारले याचा जाब विचारत एका पालकाने आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्या-पकाला मारहाण केली. यामध्ये सदर मुख्याध्यापक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पालकाला ताब्यात घेतले आहे.शिंगवे जिल्हा परिषदेच्या शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक संजय हरी गवळी यांच्यावर गुरूवारी सकाळी १०.३५ वाजेच्या सुमारासगावातीलच भाऊसाहेब सोपान बोरसे यांनी हल्ला केला.त्यांचा इयत्ता तिसरीतील मुलगा सार्थक याला का मारले व का रागावले अशी विचारणा करत संतप्त बोरसे यांनी गवळी यांच्या डोक्यात जड कड्याने मारले. त्यात गवळी यांचे डोके फुटले असून त्यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सरू आहेत.दरम्यान चांदवड पोलीस स्टेशनला शिक्षकांच्या फिर्यादीवरुन सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून भाऊसाहेब बोरसे यास ताब्यात घेतले आहे. अधिक तपास हवालदार नरेश सौंदाणे हे करीत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ चांदवड पंचायत समितीमध्ये सर्व शिक्षक संघटनाच्या प्रतिनिधींनी एकत्र जमून निषेध नोंदविला. तसेच मारहाण करणाºयावर कडक कारवाईची मागणी केली. तालुक्यातील शिक्षकांच्या वतीने पोलीस निरीक्षक संजय पाटील, गटशिक्षणाधिकारी बी.टी.चव्हाण यांना निवेदन दिले. यावर संघटनेचे शिवाजी शिंदे, केशव जाधव , सुनील सोनवणे, निवृत्ती अहेर व पदाधिकाºयांच्या सह्या आहेत.
शिंगवेत पालकाकडून मुख्याध्यापकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 12:30 AM
गुन्हा दाखल : संशयिताला घेतले ताब्यातचांदवड : मुलास का रागावले व मारले याचा जाब विचारत एका पालकाने आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्या-पकाला मारहाण केली. यामध्ये सदर मुख्याध्यापक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पालकाला ताब्यात घेतले आहे.
ठळक मुद्दे गवळी यांचे डोके फुटले असून त्यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल