सटाणा : येथून जाणार्या शिर्डी-साक्र ी महामार्गावरील खड्ड्यांमुळे मार्गाची चाळण झाली असून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. महामार्गावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांमध्ये वाहने पडून अनेक वाहने नादुरु स्त झाली आहेत. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना गाडी चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर कित्येक वाहनधारकांना जायबंदी व्हावे लागले आहे. संबंधित विभागाकडून या महामार्गावरील खड्ड्यांची कुठलीही दुरु स्ती होत नसल्याने वाहनधारकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.ढोलबारे फाटा ते द्वारकाधिश हॉटेल येथील काही ठिकाणी महामार्गावरील रस्ता गायब झालेला दिसतो. महामार्गावर मोठ-मोठी खड्डे पडले असल्यामुळे रोज अपघातांना आमंत्रण मिळत आहे. अनेक ठिकाणी खड्डे तीन ते चार फूट तर तर काही ठिकाणी पाच ते सात फूट रु ंदीचे मोठमोठे खड्डे पडले असून महामार्गावरील या पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे.या महामार्गावरून प्रवास करताना भावडबारी, डांग्या मारु ती, पिर साहेब , औंदाणे गाव, तरसाळी फाटा, वनोली, वीरगाव, करंजाड लागते. त्या रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे वाहने खड्ड्यात आदळत आहेत. यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रात्रीच्या वेळेस वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे अपघातही घडत आहेत.अनेकांना पाठदुखीच्या आजारांनी घेरलेमहामार्गावरील खड्ड्यांमुळे शेतकर्यांना पिकवलेला शेतमाल तालुक्यात असलेल्या बाजार समितीत नेताना खड्ड्यांमुळे विलंब होतो. त्यामुळे शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना पाठदुखीच्या आजारांनी घेरले आहे. विंचुर प्रकाशा हा महामार्ग गुजरातला जाण्यासाठी व नाशिक, धुळे, मालेगाव, सिन्नर, मनमाड येथे जाण्यासाठी जवळचा व सोयीचा आहे. त्यामुले वर्दळ असते. तसेच या भागातील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना लागणारा कच्चा मालही याच महामार्गावरु न नेला जात असल्याने खड्ड्याच्या दुरवस्थेत आणखी भर पडत आहे.अनेक वेळा निवेदन दिले असुन, महामार्गावरील खड्ड्यात वृक्षारोपणही केले होते. संबंधित विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. संबंधित विभागाने आठ दिवसांच्या आत महामार्गावरील खड्डे व बुजविल्यास कोणतीही सूचना न देता रास्ता रोको करण्यात येईल.हा महामार्ग खड्ड्यामुळे मृत्युचा सापळा बनला असून, महामार्गाची पूर्णत: चाळण झाली आहे.रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता तेही समजत नाही. मार्गक्र म करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने खड्ड्यात आदळत असुन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.लवकरात लवकर खड्डे बुजवून होणार्या त्रासापासून सुटका करावी.- प्रभाकर रौंदळ, माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीमहामार्गावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे पिकविलेला माल तालुक्यात तसेच इतर बाजार समतिीत विक्र ीसाठी नेण्यास विलंब होतो. त्यामुळे मोठ्या कष्टाने पिकविलेला माल बाजारपेठेत कवडीमोल भावात विकावा लागत आहे.तसेच या खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारकांना पाठदुखीच्या आजाराने ग्रासले असुन,अनेक वाहणे रात्रीच्या वेळेस खड्ड्यात पडुन अपघात घडुन वाहनधारक जायबंदी होत आहेत.- दीपक रौंदळ, शेतकरी(फोटो : 12सटाणा1,2,3)