लोकमत न्यूज नेटवर्क इंदिरानगर : ‘नीट’ परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पोषाखाबाबत नियमांच्या आधारे प्रवेश नाकारण्यात आल्याने केंब्रिज स्कूल येथील केंद्रावर विद्यार्थ्यांनी शर्टाच्या बाह्या कापून परीक्षा दिली. तत्पूर्वी पोषाखाविषयी माहिती नसल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद मिटविला. विद्यार्थ्यांनी शर्टच्या बाजू कापून नीटचा पेपर दिला. सीबीएसइने नीट परीक्षेसाठी पोषाखाची नियमावली ठरवून दिली होती. परंतु याविषयी आवश्यक तेवढी जनजागृती करण्यात आली नाही. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रकारचा गणवेश परिधान केला नसल्याचे सांगून परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला. त्यामुळे परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अखेरीस काही पालकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. परीक्षेला येताना हाफबाहीचा शर्ट असणे आवश्यक आहे. याबाबतची स्वतंत्र नियमावली तयार करण्यात आली असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पालक व विद्यार्थ्यांची समजूत घातली़ल्यानंतर पालकांनी स्वत:हून विद्यार्थ्यांच्या शर्टच्या बाह्या कापल्या व विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात पाठवले. तर काही पालकांनी समोर असलेल्या एका दुकानात गर्दी करून विद्यार्थ्यांसाठी नवीन कपडेच विकत घेतल्याचे दिसून आले. अचानकपणे हा नियम समोर आल्याने अनेक पालकांची धावपळ झाली असली तरी नीट परीक्षेच्या नियमावलीत हा नियम असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
शर्टाच्या बाह्या कापून दिली ‘नीट’ परीक्षा
By admin | Published: May 08, 2017 1:16 AM