पंचवटी : हिरावाडीतील शिवमल्हार सेवाभावी संस्था खंडेराव महाराज यात्रोत्सव समितीची बैठक गुरुवारी (दि.७) संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उदय गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी झालेल्या बैठकीत आगामी चंपाषष्टीनिमित्ताने आयोजित यात्रोत्सवाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.डिसेंबर महिन्यात चंपाषष्टी असून, चंपाषष्टीला हिरावाडी येथे खंडेराव महाराज यात्रा भरते तसेच्या यात्रानिमित्त परिसरात बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्र मदेखील संपन्न होत असतो.यात्रोत्सव निमित्ताने भंडाराकार्यक्रम देवाचे गाणे भजन-कीर्तन आदींसह विविध कार्यक्रम होणार असून, या उत्सव समितीची कार्यकारिणी निवडण्यात आली.कार्यकारिणीत बारा गाड्यांचे मानकरी म्हणून गणेश आंबेकर यांची, तर अध्यक्ष म्हणून मोहित भडांगे, उपाध्यक्ष म्हणून पवन बागुल, नितीन अहिरे, सचिव म्हणून सुनील भुतेकर, गणेश लोणारे, खजिनदारपदी कांतीभाई परमार, उपखजिनदारपदी सागर नेन्हे, सल्लागारपदी पद्माकर भोईर, आशितोष चव्हाण, तसेच प्रसिद्धीप्रमुख म्हणून विकी लहाने, शुभम पवार यांची निवड करण्यात आली, तर उर्वरित कार्यकारिणीत सदस्यपदी दौलत बागुल, नारायण अस्वले, किरण आवारे आदींची निवड करण्यात आली.यावेळी झालेल्या बैठकीत दिगंबर मोगरे, पोपट इंगळे, मंगेश चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले.चंपाषष्टीजवळ आल्याने शहरातील खंडोबाराया मंदिरातील धार्मिक सोहळ्यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने तयारी केली जात आहे. देवळाली कॅम्प टेकडी येथील मंदिरात उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. मंदिराला रंगरंगोटी केली जाणार असून, दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याचे सांगण्यात आले. शहरातील गोदाकाठावरील मंदिरातदेखील दरवर्षीप्रमाणे यंदा उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. उपनगरांमध्ये असलेल्या खंडोबा महाराज मंदिर परिसरातील स्वच्छता कामांना सुरूवात झाली आहे.
शिवमल्हार सेवाभावी संस्था यात्रोत्सव नियोजन बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 1:12 AM